Divorce Causes: तुम्हीही नात्यातील 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करताय?वेळीच व्हा सावध

नातं आनंदी टिकवून ठेवण्यासाठी प्रेम आणि विश्वास असणे पुरेसे नसून इतर गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. अन्यथा नात्यात दुरावा येऊन नातं तुटू शकते.
Divorce Causes
Divorce CausesDainik Gomantak
Published on
Updated on

relationship read reasons of divorce and why marriage fail read full story

लग्नाची सोनेरी स्वप्ने पाहणाऱ्या लोकांसाठी घटस्फोट घेणे हा खूप मोठा निर्णय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात जोडीदारासोबत काही जबाबदाऱ्याही येतात. अनेक तडजोडी कराव्या लागतात आणि कधी-कधी तुम्हाला मॅच्युरिटी घेऊन आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे लग्न करण्याला नकार न देता नातं जपण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

भारतात ज्या प्रकारे घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत, ते लक्षात घेता या गोष्टींवर चर्चा होणे गरजेचे आहे. नातं टिकवून ठेवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

संवादाचा अभाव

तुम्ही एकत्र राहत असाल पण एकमेकांशी बोलत नसाल तर एकत्र राहण्यात अर्थ नाही. हे काही काळ सहन केले जाऊ शकते, परंतु जास्त काळ नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मौन राखून तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याची चूक समजू शकता, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. जास्त वेळ संवादाचा अभाव असल्यास नातं तूटू शकते.

क्वॉलिटी टाइम

नातं टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम घालवणे गरजेचे असते. तुम्ही जर एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम घालवू शकत नसाल तर असे नातं जास्त काळ टिकून राहत नाही.

इगो

इगो केवळ विवाहित नातेसंबंधातच नाही तर इतर नातेसंबंधांमध्ये देखील कटूता आणू शकतात. अहंकार घेऊन बसलेले लोक स्वतःला हुशार समजतात. काय बरोबर आणि काय चूक हे ओळखताही येत नाही. जर तुमच नातं तूटू नये असे वाटत असेल तर तुम्हाला अहंकार बाजूला ठेवावा लागेल.

पजेसिव्ह

जोडीदाराचा पडेसिव्ह स्वभावही लग्नाच्या घटस्फोटाचे कारण असू शकते. प्रेम आणि वेडेपणा यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. अशा लोकांसोबत काही तास घालवणेही अवघड होऊन बसते,अशा लोकांसोबत आयुष्य घालवण्याची कल्पना करणे फारच अवघड असते. तुम्हीही अशाच स्वभावाचे असाल तर सावधान व्हा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com