Skin Care Tips: रक्षाबंधनला हातावर मेहंदी लावण्याआधी 'या' 4 गोष्टींची घ्या काळजी

हातावर मेहंदी लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतल्यास अॅलर्जी होणार नाही.
Skin Care Tips
Skin Care TipsDainik Gomantak

Skin Care Tips For Raksha Bandhan: हातावर मेहंदी लावल्याशिवाय कोणताही सण,कार्यक्रम पुर्ण होत नाही. रक्षाबंधनला मुली मोठ्या आवडीने हातावर मेहंदी लावतात. पण सध्या अनेक मुली प्रोफेशनल्सकडून मेहंदी लावणे पसंद करतात.

मेहंदीचा रंग डार्क होण्यासाठी अनेक केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचा खराब होऊ शकते. मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी त्यात पॅरा फेनाइलनेंडियामन हा घटक टाकला जातो.

हा घटक त्वचा आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. यामुळे मेहंदी लावण्याआधी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • मेहंदी सुट होते की नाही पाहावी

जर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल्सकडून मेहंदी लावण्याचा प्लॅन करत असाल तर हातावर मेहंदी लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.

तळहातावर मेंदी लावून एक छोटा ठिपका बनवा आणि त्यामुळे खाज येत असेल तर लावणे टाळावे.

  • ऍलर्जी औषध घ्या

मेहंदी लावल्यानंतर त्वचेवर जळजळ, पुरळ किंवा लालसरपणा दिसल्यास मेहंदी लगेच धुवावी. नंतर ऍलर्जीचे औषध घ्यावे. जास्त त्रास होत असेल तर त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यावा

Skin Care Tips
लाइफस्टाइलमधीला 'हे' 5 बदल हाडांचे आरोग्य ठेवतील निरोगी
  • तज्ञांची मदत घ्या

मेहंदी लावल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बारिक पुरळ येणे अशा कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास लगेच त्वचारोग तज्ञाशी संपर्क साधावा.

कधीकधी केमिकलमुळे होणारी ऍलर्जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

  • घरगुती मेहंदी लावा

केमिकल रिअॅक्शन टाळण्यासाठी तुम्ही घरी मेहंदीची पेस्ट तयार करू शकता. उत्तम आणि सुंदर डिझाईनसाठी तुम्ही प्रोफेशनल्सकडून मेहंदी लावून घेऊ शकता पण मेहंदी तुम्ही बनवलेली घेऊन जा. यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com