अजगर हा जगातील सर्वात लांब साप आणि तितकाच सर्वात वजनदार सापांपैकी एक मानला जातो. अजगर प्रथम चावतात परंतु काही मिनिटांतच गुदमरून किंवा हृदयविकाराने त्यांचा बळी घेतात. त्यानंतर अजगर त्यांची शिकार पूर्ण गिळतात.
अक्षरशः काही सेकंदात, अजगर एखाद्या व्यक्तीच्या शरीराभोवती त्याचे शक्तिशाली वेटोळे गुंडाळू शकतो, मेंदूतील रक्त परिसंचरण बंद करू शकतो, वायुमार्ग बंद करू शकतो आणि छातीचा विस्तार रोखू शकतो. यापैकी एक किंवा सर्व कारणांमुळे, एखादी व्यक्ती लवकर मरण पावते. (Python Attack Viral Video )
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस पाळीव अजगराला हाताळताना दिसत आहे. त्यावेळी अजगराने अचानक माणसावर हल्ला केला. 'laris_a9393' ने ही व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये तो माणूस एका मोठ्या बॉक्समध्ये काहीतरी करत असल्याचे दिसते. त्यावेळीच अजगर त्याच्यावर हल्ला करताना दिसतो.
इथे पाहा हा व्हिडिओ :
जेव्हा अचानक, अजगराने माणसाच्या चेहऱ्याचा चावा घेतला आणि काही केल्या तो माणसाला सोडेना. त्यानंतर तो वेदनेने ओरडू लागतो. संपूर्ण कुटुंब त्याला वाचवण्यासाठी मदतीसाठी धावून येते. त्या माणसाच्या चेहऱ्यावरून अजगराला काढण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात पण अपयशी ठरतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.