

Pitru Paksha: हिंदु धर्मात पितृपक्षाला खुप महत्व आहे. पितृपक्षात पितरांची मनोभावे पुजा केली जाते. यामुळे पितृदोष कमी होऊ शकतो. आजपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. तर १४ ऑक्टोबरला संपणार आहे. मनेभावे पुजा केल्यास पितर प्रसन्न होतात. तसेच काही गोष्टींची काळजी घेतल्यास जीवनात सुख-शांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया दररोज कोणती कामे करावी.
जल अर्पण करावे
पितृपक्षात दररोज जल अर्पण करावे. परंतु ज्यांचे आई-वडील जीवंत आहेत त्यांनी हे काम करू नये. ज्यांचे आई-वडील जीवंत आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. ज्याचे माता-पिता जीवंत नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून जल अर्पण करावे.
गाईला चारा द्यावा
पितृपक्षात दररोज गाईला चारा खायला द्यावे. यामुळे देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही प्रसन्न होतात. पितृ पक्षात गाईला हिरवा चारा खाऊ घालण्याने पितरांची नेहमी कुटुंबावर कृपादृष्टी राहते.
दिवा लावावा
पितृ पक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे शुभ मानले जाते. पितृ पक्षात पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात. तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो.
प्रवेशद्वारावर गंगाजल टाकावे
पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होतो. तसेच पितृपक्षात दररोज आंघोळ करताना पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे.
ही गोष्ट ठेवा लक्षात
पितृ पक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नका. तसेच घर स्वच्छ ठेवावे. पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. रात्री रिकामी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात खरकटी भांडी घरात ठेवू नयेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.