Relationship Tips: पालक आणि मुलांचे नाते नेहमीच स्पेशल असते. अगदी जन्मापासून आई-वडील आणि मुलाचे नाते अनोखे असते. पालकांच्या वागण्या-बोलण्यातून, आई-वडीलांनी त्यांना आणि इतरांना दिलेल्या वागण्यातून मुले बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तशाच प्रकारचे वागण्याचा ते प्रयत्न करत असतात.
जसजशी मुले मोठी होतात त्यावेळी त्यांच्यात मतभेद आणि काहीवेळा दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेतली तर पालक आणि मुलांचे नाते आणखी घट्ट होऊ शकते.
१. तुमची मुले जसजशी मोठी होत असतात तेव्हा त्यांच्याबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करा. त्यांना काही गोष्टी ठरवून द्या. ते जसजसे मोठे होतील तेव्हा त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे संभाव्य परिमाणांचीदेखील त्यांना जाणीव करुन द्या.
२. दिवसातील दहा मिनिटे त्यांच्याशी कोणत्याही इतर अडथळ्याशिवाय बोला, संवाद साधा. टीव्ही बंद करा, तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाजूला ठेवा. तुमच्या मुलांना याची जाणीव होऊ द्या तुमच्यासाठी ते महत्वाचे आहेत.
३. आपल्या भारतीय परंपरेत कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून जेवण्याची पद्धत होती. मात्र अलिकडे बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे एकत्र जेवण्याची पद्धत बंद झाली आहे. एकत्र जेवण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या कुटुंबातील प्रेम वाढते.
४. तुमच्या पाल्याचे म्हणणे ऐका. त्यांचे म्हणणे समजून घ्या आणि त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करा.
५. तुमच्या मुलांसोबत खेळा. त्यांना वागण्या-बोलण्यातून कळू द्या तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.