Hair Care In Winter: हिवाळ्यात केसगळती होत असेल तर अशी घ्या काळजी

Hair Care In Winter: थंडीच्या दिवसात केसातील कोंडा तुमची मोठी समस्या बनू शकते.
Hair Care Tips
Hair Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Hair Care In Winter: जसा ऋतु बदलतो त्याप्रकारे आपल्या शरिरातदेखील वेगवेगळे बदल होताना दिसतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. सर्दी-खोकला यासारख्या आजारांबरोबरच त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, केसांत कोंडा होणे यासारख्या बाबींना सामोरे जावे लागते.

अनेकदा केसात कोंडा झाल्यावर ऑफीससारख्या ठिकाणी जाणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे लाजिरवाणे वाटते. थंडीच्या दिवसात केसातील कोंडा तुमची समस्या बनू शकतो. चला तर जाणून घेऊयात हिवाळ्यात आपल्या केसांची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे.

१. केसांसाठी तुम्ही जे तेल, शॅम्पू किंवा इतर काही प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल तर त्याआधी तुम्ही तुमच्या केसांची गरज ओळखून ती वापरली पाहिजेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

२. केसाला कलर करणे कमी करु शकता.

३. झोपताना सिल्कची उशी वापरु शकता.

४. तीन ते चार महिन्यातून एकदा ट्रीम करायला विसरु नका.

५. केस ओले असल्यास तसेच बाहेर पडू नका.

६. जास्त वेळ केस धुवू नका.

७. आठवड्यातून एकदा अंड्याचा वापर करु शकता.

Hair Care Tips
Rashi Bhavishya 08 December: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा पूर्ण राशीभविष्य

८. केस चांगले राहावेत यासाठी तुम्ही दह्याचा वापर करु शकता. यामध्ये व्हिटॅमीनचे चांगले प्रमाण असल्याने ते तुमच्या केसांना उत्तम पोषक घटक देत असतात. जास्त चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही त्यात तेल आणि अंड्याचादेखील वापर करु शकता.

९. खोबरेल तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑइल, अव्हाकॅडो तेल अशा पोषक घटक असलेल्या तेलाचा तुम्ही तुमच्या केसांसाठी वापर करु शकता. थंडीत आपला टाळू पूर्णपणे कोरडा झाल्याने केसगळती मोठ्याप्रमाणात होते. त्यामुळे तेलाचा वापर करणे महत्वाचे ठरते.

अशा विविध प्रकारे आपण केसांची काळजी घेऊ शकतो. याबरोबरच तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील आणि खूप दिवसांपासून तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com