Parenting Tips: मुलांना समजून घ्यायचंय? मग वयानुसार जाणून घ्या त्याच्या मनातील गोष्टी

जर तुम्हालाही मुलांना समजून घ्यायचे असेल तर पुढील गोष्टी करू शकता.
Parenting Tips
Parenting TipsDainik Gomantak
Published on
Updated on

parenting tips behavioral changes kids according their age

सर्व मुलांचा स्वभाव वागणूक ही वेगवेगळी असते. पण तरीही माहितीच्या अभावामुळे काही पालकांना इतरांची मुले पाहून मुलांच्या विकासाची काळजी वाटू लागते. परंतु येथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की काही मुले नेहमीपेक्षा उशिरा यश गाठतात. याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या विकासावर लक्ष ठेवा आणि काही शंका असल्यास, काळजी करण्याऐवजी, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्याचप्रमाणे मुलांचे त्यांच्या वयानुसार काही सामान्य वागणूक समजून घ्यावी. जेणेकरून तुम्ही पहिल्यांदाच पालक झाला असाल तर मुलाचा योग्य बौद्धिक विकास तुम्हाला सहज समजू शकेल.

दोन वर्षांची मुले

त्यांना प्रेम आणि आपुलकीची गरज असते.

पालकांच्या जवळ राहायचे असते.

त्यांना थोडे स्वातंत्र्य हवे असते.

या वर्षातील मुलं बॉसी आणि मागणी करणारा देखील असू शकतात

सगळ्या वस्तु घेऊन आपलं म्हणायची सवय असू शकते.

पालकांपासून वेगळे झाल्यावर रडणे

आई किंवा वडिलांशी जास्त जवळीक असणे.

तीन वर्षांची मुले

ते उर्जेने परिपूर्ण आहेत

त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे असते

ते नवीन मित्र बनवतात आणि सामाजिक बनू लागतात.

नवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण होते.

या वयात अनेक “का” आणि असंख्य प्रश्न विचारतात.

ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. तथापि, हे सर्व 3 वर्षांच्या मुलांना लागू होत नाही.

चार वर्षांची मुले

शारीरिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात.

का आणि कशापासून सुरू होणारे बरेच प्रश्न विचारतात

ड्रॉइंग काढण्यात रस दाखवतात

बेसिक वाचन आणि लेखन सुरू करतात.

बरेच मित्र बनवतात, कारण आता ते चांगले बोलू लागले.

पाच वर्षांची मुले

स्वत: नाव लिहिण्याचा प्रयत्न करतात.

तुमच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलायला लागतात.

घर-घर, डॉक्टर-डॉक्टर इत्यादी अनेक भूमिका खेळतील.

सर्वात जास्त म्हणजे ते मोठे झाल्यावर त्यांना काय बनायचे आहे ते शेअर करतात.

रंगीबेरंगी पुस्तके भरत राहतात आणि कल्पनेतून चित्र पुस्तके बनवायला सुरुवात करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com