Optical Illusion: जे दिसतं ते असतंच असं नाही! चित्रात लपलेल्या 'या' गोष्टी शोधण्याइतके स्मार्ट तुम्ही आहात का?

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Optical Illusion Viral Images
Optical Illusion Viral Images Dainik Gomantak
Published on
Updated on

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनबद्दल तर तुम्ही ऐकले असेलच. Optical Illusion केवळ डोळ्यांशीच नाही तर मनाशीही खेळ खेळतो. कारण वास्तविकता आपण पाहतो त्याच्या अगदी उलट असते.

Optical Illusion ची अनेक चित्रे सध्या आपण पाहिली असतील, ज्यामध्ये काहीतरी दडलेले शोधायचे असते. आपल्या समोरच असलेली गोष्ट शोधायला आपल्याला बराच वेळ लागतो, कारण आपल्यावर Optical Illusion चा प्रभाव असतो.

सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही स्ट्राँग ऑप्टिकल इल्युजन छायाचित्रे घेऊन आलो आहोत. जर खरंच तुम्ही स्मार्ट असाल तर खालील चित्रात दडलेल्या गोष्टी शोधून दाखवाच.

Optical Illusion Viral Images
Vastu Tips For Home: सूर्यास्तानंतर या वस्तू कधीही घरात आणू नका; घरातील सुख-शांतीवर होईल परिणाम
Optical Illusion
Optical Illusion Dainik Gomantak

या हत्तीला किती पाय आहेत?

या चित्राने लोकांच्या डोक्याचे दही करून टाकले आहे. तुम्हाला हे चित्र समजले असेल तर हत्तीला किती पाय आहेत ते नक्की सांगा. कलाकाराने अतिशय हुशारीने हत्तीचा हा फोटो बनवला आहे. वास्तविक, या चित्रात हत्तीचा फक्त एकच पाय म्हणजे मागचा डावा पाय व्यवस्थित तयार झाला आहे, पण बाकीचे नाहीत. म्हणूनच या हत्तीला चार पाय नसून पाच पाय दिसत आहेत.

Optical Illusion
Optical Illusion Dainik Gomantak

वरील फोटोमध्ये तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय?

हे चित्र एका ट्विटर वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केले आहे. या पॅटर्नमध्ये अनेकांना मांजर दिसले तर काहींना हरिण दिसले. याची गंमत म्हणजे या चित्रात कोणताच प्राणी दडलेला नाही; तो फक्त आपल्या मेंदूने तयार केलेला एक भ्रम आहे आणि त्यालाच आपण Optical Illusion म्हणतो. तुम्ही पॅटर्नच्या कोणत्याही भागावर झूम इन केल्यास, भ्रम नाहीसा होईल.

Optical Illusion
Optical Illusion Dainik Gomantak

चित्रात तुम्हालाही गाढव दिसतंय? मग पुन्हा फोटो बघा!

@jk_rowling नावाच्या युजरने ट्विटरवर हे चित्र शेअर केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - हे गाढव आहे, पण या चित्रावर लिहिले आहे की जर तुम्ही उजव्या मेंदूचा वापर केला तर तुम्हाला यामध्ये मासा दिसेल, जर डावा मेंदूचा वापर केला तर जलपरी दिसेल. पण गंमत अशी की, बहुतेक लोकांना चित्रात फक्त गाढवच दिसत आहे.

Optical Illusion
Optical Illusion Dainik Gomantak

झाडात लपलेला साप पाच सेकंदात सापडेल का?

झाडाची पाने पूर्णपणे हिरवी तर फांद्या तपकिरी रंगाच्या असल्याचे या चित्रात दिसत आहे. त्यांच्यामध्ये साप अतिशय हुशारीने लपलेला आहे. आता तुम्ही पाच सेकंदात साप शोधू शकता का ते तपासा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com