उपवास (Fasting ) म्हंटल की आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो खिचडी सोडून नेमक करायच काय कारण आपल्याला नक्की माहीत नसते की उपवासला कोणत्या गोष्टी चालतात? अगदी छोट्यातला छोटा पदार्थमुळे आपला उपवास मोडू शकतो. बटाटा (Potato), रताळे, केळे, वरी, साबुदाणा, शेंगदाणे हे आपल्याला माहित असलेले काही पदार्थ आहेत, म्हणूनच या पदार्थांचा वापर करून आपण नवनवीन पदार्थ करू शकतो, कुठल्या धर्मग्रंथात उपवासच्या पदार्थांचा उल्लेख केला गेला नाही परंतु चालत आलेल्या प्रथेप्रमाणे हे काही प्रमुख पदार्थ आहेत. शक्यतो उपवासच्या दिवशी पौष्टिक आहार (Healthy Diet ) घ्यावा. तुम्हाला जर का पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही दुधाचे सेवन करणे आवश्यक आहे.
उपवसाच्या दिवशी काय खाल?
उपवासाच्या दिवशी आरोग्याला चांगले असणारे सुद्धा पदार्थ आहेत. यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही, सुरण व कच्च्या केळ्याचे काप, शहाळ्याचे पाणी, दूध, फ्रूट सॅलड, मसाला दूध, मिल्कशेक, सर्व प्रकारची फळे फळे, खजूर, अंजीर, बेदाणे, नुसताच एखादा उकडलेला बटाटा, रताळे, बटाटा किंवा रताळयाचा कीस, रातल्याची गोड काप राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाणा किंवा राजीगऱ्याची चिक्की, शिंगाडय़ाचे पीठ व खजूर लाडू हे तुम्हाला उपवासासाठी उत्तम आणि पौष्टिक पदार्थ आहेत.
पदार्थांचे गुणधर्म :
वरीचे तांदूळ : ज्यांना शाबुदाण्याचा त्रास होतो त्यांनी वारीच्या तांदळाचा वापर करावा, वरीच्या तांदळातही जीवनसत्त्वे, खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.
राजगिरा :कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम व पोटॅशियम ही खनिजे या मधून मिळतात. राजगिऱ्यात तंतूमय पदार्थही चांगले असतात, सोबतच ‘क’ जीवनसत्व आणि ‘लायसिन’ हे अमिनो आम्ल यातून मिळते. 100 ग्रॅम राजगिऱ्यात 103 उष्मांक आणि19 ग्रॅम पिष्टमय पदार्थ असतात.
शिंगाडा : शंभर ग्रॅम शिंगाडय़ातून सुमारे 97 उष्मांक मिळतात. त्यातून प्रथिने, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि ‘क’ जीवनसत्व मिळते .
बटाटा : पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाटा हा सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी ने परिपुर्ण असतो. बटाटा नेहमी सालासोबत शिजवला पाहीजे. बटाट्याचा सर्वात पौष्टिक भाग त्याच्या सालाच्या खाली असतो, ज्यामुळे शरीराला भरपूर प्रोटीन आणि खनिजने मिळतात.
रताळ: हे एक गोड कंदमूळ असून रताळं हे आपण बहुधा उपवासासाठी वापरतो. बटाट्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असलेलं हे कंदमूळ भरपूर स्टार्चने युक्त असून शरीराला ताबडतोब ऊर्जा देण्याचं काम करतं.रताळ्यात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात असतं. केशरी रताळ्यात ‘अ’ जीवनसत्त्व जास्त असतं. म्हणूनच याचा डोळे, त्वचा, हाडे, नसा यांचं आरोग्य सांभाळण्यासाठी रताळ्याचा उपयोग होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.