यंदा 15 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून नवरात्र सुरु होणार आहे. देशभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र नवरात्रीची तयार अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. तर काही लोक लठ्ठपणा वाढतो म्हणून फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात.
जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर कोणत्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया. नवरात्री दरम्यान आहारात फळांचा समावेश करावा. शाबुदाणा, भाजलेले शेंगदाणे, मखाना, पनीर याचे सेवन टाळावे.
शाबुदाणा खिचडी
उपवासा दरम्यान खिचडी एवजी फळांचे सेवन करावे. कारण फळांच्या तुलनेत शाबुदाणा खिचडी पचनास जड असते. कारण त्यात भरपुर कॅळरीज असते. तसेच त्यात बटाटे आणि मसाले असल्याने कॅलरीजचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. यामुळे शाबुदाणा खुचडी खाणे टाळावे. जर खायची असेल तर दिवसा खावी.
नवरात्रीत असा असावा आहार
नाश्ता
शिंगाड्याचा उपमा किंवा राजगीराचा किंवा एक वाटी दही खावे
नाश्ता नंतर
फुल क्रिम दुधासह कमी साखर आणि उच्च फायबर फळांचे सेवन करावे. जसे सफरचंद, नाशपाती किंवा पपई खावी.
दुपारचे जेवण
शिंगाड्याची खिचडी दुधी भोपळ्याची भाजी आणि फुल मिल्क चीजचे तुकडे.
संध्याकाळ
दही किंवा दुधासह बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे यांसारखे सुकामेवांचे सेवन करावे.
रात्रीचे जेवण
एक वाटी पनीर, राजगिरा रोटी आणि दुधी भोपळ्याचा रायता खावा.
नवरात्रीत उपवास करत असाल तर या गोष्टी टाळा
तळलेले पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी वाफवलेले पदार्थ खावे.
साखरेऐवजी इतर गोड पदार्थ खावे.
साबुदाणा, मखणा यासारखे हाय कॅलरी पदार्थ वजन वाढवतात. अशा पदार्थांचे सेवन कमी करावे.
सुक्या मेव्यांऐवजी फळांचे सेवन करावे.
उपवास दरम्यान, दिवसभर शक्य तितके पाणी प्या.
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन तेव्हाच करा जेव्हा ते तुमच्या आतड्याला अनुकूल असतील. जर तुम्हाला याची अॅलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका. त्याऐवजी तुम्ही शाकाहारी प्रोटीन पावडर वापरू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.