National Mango Day 2023: राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त जाणून घ्या या दिवसाचे महत्व

National Mango Day 2023: आंबा हे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्त्रोत आहे ज्यांचे आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात.
Mango
Mango Dainik Gomantak
Published on
Updated on

National Mango Day 2023: फळांचा राजा म्हणून ज्या फळाला मान मिळाला आहे ते फळ म्हणजे आंबा आहे. आज 22 जुलै हा दिवस राष्ट्रीय आंबा दिवस म्हणून साजरा करतात. आंब्यामध्ये इतर फळांमध्ये जास्त व्हिटॅमिन असल्याने हे फळ वर्षातून एकदा खाल्ले तरी त्यातील पोषक घटक वर्षभर आपल्या शरीरात राहत असल्याचे म्हटले जाते.

आजचा हा विशेष दिवस आपल्याला आंब्यामुळे मिळणारे स्वादिष्ट स्वाद, भरपूर फायदे आणि आश्चर्यकारक आरोग्य फायदे यांचा आनंद घेऊ देतो.

आंबा हे जागतिक स्तरावर सर्वात प्रिय फळांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि भारतीय इतिहासात त्याचे विशेष स्थान आहे. आईस्क्रीम, मूस, स्मूदी आणि इतर विविध प्रकारचे पदार्थ हे तोंडाला पाणी आणणारे इतर पदार्थाद्वारे तुम्ही या अनोख्या चवीचा आनंद घेऊ शकता. जगभरातील लोकांना हे फळ आवडते, जे खूप लोकप्रिय आहे.

राष्ट्रीय आंबा दिवस का साजरा करतात?

भारतीय राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने 1987 मध्ये आंब्याचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून आंतरराष्ट्रीय आंबा महोत्सवाची कल्पना मांडली. तेव्हापासून दरवर्षा हा महोत्सव साजरा केला जातो.

महत्वाचे म्हणजे अनेक आंबाप्रेमी या दिवसाची वाट पाहत असतात. देशभरातील आंब्याच्या चाहत्यांना आंब्याचे व्यस्त बाजार, रंगीबेरंगी प्रदर्शने आणि भरपूर स्वादिष्ट पदार्थ आकर्षित करताना दिसतात.

इतिहास काय सांगतो?

आंब्याचा 5,000 वर्षांचा इतिहास आहे. त्याचबरोबर, त्याचा भारतीय लोककथांशी जवळचा संबंध आहे. "आंबा" हा शब्द मलायन शब्द "मन्ना" वरून आला आहे आणि फळाच्या बिया आशियापासून जगाच्या इतर अनेक प्रदेशांमध्ये पसरल्या आणि तिथे हा आंबा उगवला. भारतात आंब्याला प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक मानले जाते.

औषधी आंबा

अनेक वर्षांपासून लोक उपचारांसाठी आंब्याची पाने, साल वापरले जाते. याबरोबरच आंबा हे काजू आणि पिस्त्यांशी देखील जोडले असून ही सर्व फळे Anacardiaceae कुटुंबातील आहेत.

या दिवसाचे महत्व

स्वादिष्ट आणि आरोग्यदायी उष्णकटिबंधीय फळ, आंबा यांचा सन्मान करणारा वार्षिक कार्यक्रम म्हणून, राष्ट्रीय आंबा दिन अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा विशिष्ट दिवस आंब्याचे सांस्कृतिक महत्त्व समजावून देतो.

Mango
Oil To Lower High Cholesterol Level: 'हे' तेल करेल तुमचे कोलेस्ट्रॉल दूर

एक स्वादिष्ट फल असण्याव्यतिरिक्त, आंबा हे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्त्रोत आहे ज्यांचे आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. राष्ट्रीय आंबा दिनाचा उत्सव प्रत्येकाला या आवडीच्या फळाच्या चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेण्यास संधी देतो आणि त्याचबरोबर त्याचा प्रदीर्घ इतिहास, जाणून घेण्यासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

असा साजरा करु शकतो आंबा दिवस

  • आंब्याचा आनंद घ्या: ताजे, पिकलेले आंब्याचे तुकडे खा किंवा मँगो साल्सा, मँगो स्मूदीज, मँगो लस्सी आणि मँगो आइस्क्रीम अशा आंब्याच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

  • आंब्याबद्दल जाणून घ्या: आंब्याचे विविध प्रकार, त्यांचे उत्पादन आणि या फळांचे सांस्कृतिक महत्त्व याबद्दल जाणून घ्या.

  • आंब्याचे विविध पदार्थ एकत्र करा: मित्र आणि कुटुंबियांना तुमच्या आवडत्या आंब्याचे पदार्थ त्यांच्यासोबत शेअर करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com