Monsoon Illness: पावसाळा अनेक लोकांचा आवडता ऋतु आहे. पण पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार देखील घेऊन येतो. वातारणातील बदलांमुळे अनेक व्हायरस पसरतात. यामुळे सर्दी, खोकला,ताप यासारख्या समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे आयुर्वेदिक औषधांचा वापर करून तुम्ही रोगप्रतिकारशक्ती मजबुत करू शकता.
पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी या आयुर्वेदीक औषधांचा करावा वापर
तुळस
तुळशीच्या रोपाला हिदु धर्मात खुप महत्व आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळसीचा वापर केला जातो. यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म असतात. यामुळे पावसाळ्यात तुळशीच्या पानांचा वापर करावा. यामुले रोगप्रतिकारशक्ती मजबुत राहते. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते. सर्दी, खोकला सारखे आजार दूर राहतात.
गिलोय
गिलोय ही एक आयुर्वेदीक औषधीयुक्त वनस्पती आहे. यामुध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे श्वासाचा संसर्ग दुर राहतो.तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदकत करते. पावसाळ्यात आणि नंतर आपल्या आहारात गिलोयचा समावेश केल्यास सर्दी, ताप, खोकला यासारखे अनेक आजार दूर राहतात.
अश्वगंधा
अश्वगंधा ही एक औषधीयुक्त वनस्पती आहे. यामुळे तणाव कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी अश्वगंधाचा वापर करावा. ही वनस्पती पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करते. दूध, स्मुदीमध्ये अश्वगंधाची पावजर टाकून सेवन करू शकता.
कडूलिंब
कडूलिंब बहुगुणी औषधीयुक्त वनस्पती म्हणून ओळखली जाते. यामध्ये बॅक्टेरियाविरोधात लढण्याची शक्ती असते.यामुळे पावसाळ्यात याचे सेवन केल्यास अनेक आदार दूर राहतात. कडूलिंबाचा वापर तुम्ही पावडरच्या स्वरूपात करू शकता. यामुळे अॅलर्जी, श्वसनाचे आजार आणि पचनासंबधित आजार दूर राहतात.
शेवगा
शेवगा देखील पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. ही औषधी वनस्पती जीवनसत्वे, खनिज यासारख्या पोषक घटकांनी समृद्ध असते. पावसाळ्यात शेवगाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सी चा मुख्य स्त्रोत आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते. ही औषधी वनस्पती पचन संस्था सुरळित कार्य करण्यास मदत करते. आवळ्याचा फ्रेश ज्सुस, पावडर, आवळा कँडी, मुरंबा करून आहारात समावेश करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.