नवी दिल्ली : दैनंदिन जीवन जगताना अनेकदा आपण फक्त बाह्य शरीरावर लक्ष देतो. खरचटलं, लागलं, खुपलं तर लगेचच त्यावर औषधपाणी केलं जातं, मात्र जीवन जगताना मनावर होणाऱ्या अनेक परिणामांचा आपण विचार सुद्धा करत नाही. कोरोना काळात मानसिक आरोग्य देखील का महत्वाचं आहे हे जगाला समजलं.
मात्र, दुसरीकडे जगभरात ‘एकाकीपणा’ याने ग्रासलेल्या तरुणाईची संख्या देखील वाढलीये. एकाकीपणातूनच गंभीर आजार होऊ शकतात असं सांगितलं जातं. पण खरंच एकाकीपणा हे गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरते का? मानसिक आरोग्य आणि गंभीर आजार याचा काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरं एका रिसर्चमधून मिळाली आहेत.
चीनमधील ग्वांगझो मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यूके, चीन आणि यूएसमधील 5,01,100 लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं.
संशोधकाच्या असे निदर्शनास आलं की, एकाकीपणाचा कर्करोग, हृदयविकार, पाचन समस्यांसह 30 इतर आरोग्य स्थिती यामध्ये संबंध आढळला होता. एकूण 56 पैकी 30 आजारांचा एकाकीपणाशी संबंध निदर्शनास आला.
त्यानंतर अभ्यासकांनी दुसऱ्या फेरीत झालेल्या आकडेवारीचे आणखी सखोल विश्लेषण केलं. यातून नवी माहिती समोर आली. बहुसंख्य आजार हे एकाकीपणाच्या भावनेमुळे झाले नाही. लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह या आजारांचा एकाकीपणाशी थेट संबंध नव्हता.
या आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांनी एकाकीपणाची भावनाही मनात येते असे स्पष्ट सांगितले. पण नैराश्य, अस्थमा, झोपेत श्वसनाला होणारा अडथळा (Sleep Apnea), हायपोथायरॉईडीझम, बहिरेपणा, मद्य किंवा मादक द्रव्यांचे अवलंबन (व्यसनाधीनता) अशा सहा आजारांसाठी काही अंशी एकाकीपणाची भावना ही कारणीभूत ठरू शकते असा निष्कर्षही या अभ्यासकांनी काढला.
या रिसर्चमधून एकाकीपणामुळे थेट आरोग्यावर होणारे परिणाम आणि लवकर मृत्यू होण्याची शक्यता यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असले तरी अभ्यासकांचं मत काहीसे वेगळे आहे.
प्रमुख संशोधक जिहुई झांग यांच्या मते, "एकटेपणा हे रोगाचं प्रत्यक्ष कारण नसून उद्भवणाऱ्या रोगाची एक लक्षण असू शकते .याउलट सामाजिक-आर्थिक घटक, जीवनशैली आणि अनुवांशिक पूर्वस्थिती हे रोगाचे प्राथमिक चालक असू शकतात.
प्रमुख संशोधक जिहुई झांग यांच्या मते, "एकटेपणा हे रोगाचं प्रत्यक्ष कारण नसून उद्भवणाऱ्या रोगाची एक लक्षण असू शकते .याउलट सामाजिक-आर्थिक घटक, जीवनशैली आणि अनुवांशिक पूर्वस्थिती हे रोगाचे प्राथमिक चालक असू शकतात.
यू हे देखील या अभ्यासकांच्या गटात होता. तो सांगतो, "आरोग्य अधिकाऱ्यांनी मानसिक आरोग्य सेवा सुधारण्यावर आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे." या अभ्यासामधून समजतं की एकाकीपणा आणि आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध असून एकाकीपणाला प्रभावीपणे अधोरेखित करण्यासाठी आपल्याला एक बहुआयामी दृष्टीकोन ठेवणं गरजेचं आहे, मात्र उद्धभवणाऱ्या रोगांची अनेक करणं सुद्धा असू शकतात त्यामुळे यावर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या योग्य चिकित्सा झाली पाहिजे.
आता झांग, हे याच्या अभ्यासगटाने संशोधनाची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले असून त्या दिशेने हालचाली देखील सुरू केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.