स्वयंपाकाच्या घाईत पिलरच्या मदतीने काम लवकर संपवम्यास मदत होते. ग्रेटर सेटचा वापर करून भाज्या आणि फळे तोडणे, सोलणे आणि किसणे खूप सोपे आहे. वारंवार वापरल्याने या वस्तु अस्वच्छ होतात. नंतर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. ते नीट स्वच्छ न केल्यास कालांतराने घाण आणि काळा थर त्यांच्या कडांना चिकटतो. स्वयंपाकघरातील इतर वस्तु प्रमाणेच त्यांची स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे.
लगेच स्वच्छ करावी
पिलरचा वापर झाल्यानंतर लगेच स्वच्छ केले पाहिजे. यामुळे त्यात कोणताही पदार्थ अडकून राहणार नाही.
ब्रश वापरा
बारीक छिद्रे किंवा खड्डे असलेल्या पिलरला ब्रशने स्वच्छ करावे. यासाठी तुम्ही लहान, मऊ ब्रिस्टल ब्रश किंवा जुना टूथब्रशचा वापर करू शकता. ब्लेड किंवा दातांवर हलक्या हाताने घासून घ्या.
डिशवॉशरमध्ये धुताना काळजी घ्या
काही पीलर्स डिशवॉशर सुरक्षित असतात, याचा अर्थ ते डिशवॉशरच्या वरच्या रॅकमध्ये ठेवून स्वच्छ करता येते. तुमच्याकडे असलेली खवणी किंवा पीलर डिशवॉशरमध्ये ठेवता येईल का हे तुम्ही आधी तपासले पाहिजे.
लिंबाचा रस वापरावा
पिलर स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस वापरू शकता. यामुळे त्यातील दुर्गंधी निघुण जाते. यासाठी 1 कप पाण्यात 2-3 चमचे लिंबाचा रस घालून मिक्स करावे. त्यात पिलर 10 मिनिटे सोडा आणि नंतर ते मिश्रण साबण आणि स्क्रबने स्वच्छ करा.
कोमट साबणाचे पाणी
पिलर स्वच्छ करताना कोमट साबणाच्या पाण्याचा वापर करावा. यासाठी तुम्ही साबण किंवा लिक्विड देखील वापरू शकता. २० मिनिट या पाण्यात पिलर ठेवल्यास स्वच्छ होईल.
स्पंज वापरावा
पिलर स्वच्छ करताना स्पंज वापरू शकता. पिलर घासताना काळजी घ्यावी. जर तुमचा हात घसरला तर तुम्हाला ब्लेड लागू शकतो.
कोरडे झाल्यानंतर वापरावे
पिलर नेहमी स्वच्छ आणि कोपडे झाल्यावरच पुन्हा वापरावे. त्यात ओलावा असल्यास जंगु शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.