Bad Effects of Mobile Phone on Child: मोबाईल वापरणाऱ्या मुलांमध्ये जडतोय मानसिक आजार, वेळाच व्हा सावध

टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे मुले स्मार्टफोन आणि टॅबचा वापर पूर्वीपेक्षा जास्त करत आहेत. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. यामुळे त्यांना अनेक आरोग्याशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Bad Effects of Mobile Phone on Child
Bad Effects of Mobile Phone on ChildDainik Gomantak
Published on
Updated on

Bad Effects of Mobile Phone on Child: स्मार्टफोन किंवा टॅब वापरल्याने तुमच्या मुलाला त्याच्या समवयस्कांपेक्षा जास्त मदत होईल असे तुम्हाला वाटत असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

मुलांमध्ये स्मार्टफोनचा वाढता वापर त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. एका जागतिक सर्वेक्षणात असे तथ्य समोर आले आहे जे वाचल्यानंतर प्रत्येक पालकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. 

या  सर्वेक्षणानुसार, जितक्या लवकर लहान मूल स्मार्टफोनच्या संपर्कात येईल, तितकेच त्यांना प्रौढ म्हणून मानसिक आरोग्य (Mental Health) समस्यांना तोंड द्यावे लागेल.

  • सर्वेक्षणातून तथ्य आले समोर

जागतिक स्तरावर जाहीर झालेला आणि टाइम्स ऑफ इंडियासह शेअर केलेला सर्वेक्षणाचा निकाल चिंताजनक आहे. त्यात म्हटले आहे की तरुण वयात स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या संपर्कात आल्याने मानसिक आरोग्याच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे.

लहान वयात स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार, इतरांप्रती आक्रमकतेची भावना आणि ते तरुण असताना भ्रमनिरास झाल्याचे नोंदवले गेले.

Bad Effects of Mobile Phone on Child
Home Decoration Ideas Tips: उन्हाळ्यात घर सजवण्यासाठी 'या' सिंपल टिप्स करा फॉलो

अमेरिकेतील NGO Sapien Labs ने 40 हून अधिक देशांमध्ये हा अभ्यास केला आहे. नवीन जागतिक अभ्यासामध्ये 40 पेक्षा जास्त देशांतील 18 ते 24 वयोगटातील 27,969 प्रौढांकडून डेटा गोळा करण्यात आला. 

त्यात भारतातील सुमारे 4,000 तरुणांचा समावेश आहे. महिलांना जास्त त्रास झाल्याचे दिसून आले. यामध्ये महिलांना अधिक फटका बसला. 'एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन अँड मेंटल वेलबीइंग आउटकम' अभ्यासाच्या मेंटल हेल्थ कोटिएंट (MHQ) अंतर्गत मानसिक क्षमता आणि लक्षणांचे मूल्यांकन करण्यात आले. या अंतर्गत, स्कोअरची तुलना प्रतिसादकर्त्यांमधील पहिल्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटच्या मालकीच्या नोंदवलेल्या वयाशी करण्यात आली.

Mental health
Mental healthDainik Gomantak

सर्वेक्षणात, वयाच्या 6 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन घेतलेल्या 74 टक्के महिलांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या अधिक असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, ज्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन वापरला त्यांच्यापैकी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या 61% पर्यंत कमी झाल्या. 

त्याच वेळी, वयाच्या 15 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुणांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित 52% प्रकरणे होती. अभ्यासात असे आढळून आले की ज्यांना वयाच्या 18 व्या वर्षी पहिला स्मार्टफोन मिळाला त्यांच्यापैकी 46% मानसिकरित्या अस्वस्थ किंवा संघर्ष करत होते. पुरुषांमध्येही हाच ट्रेंड दिसून आला, परंतु त्यांच्यामध्ये ही समस्या कमी होती.

  • पालकांनी घ्यावी काळजी

सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये पालकांसाठी एक स्पष्ट संदेश आहे. यामध्ये तुमच्या मुलाला स्मार्टफोन लवकर गेउ नका. न्यूरोसायंटिस्ट म्हणतात की मुलांवर समवयस्कांचा दबाव जास्त असतो. अशा परिस्थितीत, आपल्या मुलाकडे लक्ष द्या. 

मुलाचा सामाजिक विकास त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि जगाकडे नेव्हिगेट करण्याच्या क्षमतेसाठी मूलभूतपणे महत्त्वपूर्ण आहे. त्यांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com