
Sex fact: महिला जेव्हा आपल्या पुरूष पार्टनरसोबत शारिरीक संबंध ठेवतात तेव्हा त्या शारिरीक आणि भावनिक पातळीवरदेखील पार्टनरसोबत जोडल्या गेलेल्या असतात. पण, सेक्सवेळी पुरूषदेखील शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या जोडले जातात का? पुरूषांसाठी सेक्स आणि प्रेम एकसारखेच असते का? जर तुमच्याही मनात अशा शंका येत असतील तर आम्ही तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत.
पुरूष सेक्स आणि प्रेम यांकडे कसे पाहतात?
पुरूष आणि महिलांच्या लैंगिक संबंधांत त्यांच्या भावना कशा असतात, यावर अनेक रीसर्च झाले आहेत. पुरूष सेक्सवेळी आपल्या पार्टनरशी किती जोडले गेलेले असतात किंवा पुरूषांसाठी सेक्स आणि प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? या विषयी झालेल्या एका सर्व्हेक्षण अभ्यासातून एक निष्कर्ष समोर आला आहे की, महिला केवळ भावनांच्या आधारे सेक्स करत असतात, पण पुरूषांसोबतही असेच असते. यासाठी काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील.
पुरूषांसाठी सेक्स आणि प्रेम वेगवेगळे असते का?
संशोधनातून असे समोर आले आहे की, स्त्री किंवा पुरूष अशा लिंगाधारित फरकावरून सेक्सची व्याख्या करता येत नाही. कामभावना प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. काही लोक सेक्स संबंधांचा आनंद घेतात, तर काहींना यात मजा वाटत नाही. हे पुर्णतः टेस्टोस्टेरॉन या हार्मोनवर अवलंबून असते. ज्याच्या शरिरात टेस्टोस्टेरॉनची पातळी उच्च असेल ती व्यक्ती लैंगिक संबंधांबाबत अधिक सक्रिय असेल. यात स्त्री किंवा पुरूष यापैकी कुणीही असू शकतात.
संशोधन काय सांगते?
लैंगिक संबंध आणि कामुकतेबाबत पुरूष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे विचार असतात, असे 2019 च्या एका विश्लेषणातून समोर आले आहे. एका संशोधनाच काही कामुक छायाचित्रे महिला आणि पुरूषांना दाखवली गेली. त्यानंतर त्यांचे ब्रेन मॅपिंग केले गेले. त्यात पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढल्याचे दिसून आले, तर महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत फारसा फरक पडलेला नव्हता.
सतत ही कामुक छायाचित्रे पाहिल्याने पुरूषांच्या मेंदुतील हालचाली आणि शारिरीक प्रतिक्रिया तीव्र झाल्या होत्या. थेट सांगायचे तर, प्रत्येक नवे कामुक छायाचित्र पाहिल्यानंतर पुरूषांमध्ये नव्या पार्टनरसोबत शारिरक जवळीकता वाढविण्याची इच्छा वाढलेली दिसून आली. अशा जवळपास 150 अभ्यासांच्या निष्कर्षांवरून 2001 मध्ये एक समिक्षा केली गेली. त्यात म्हटले होते की, पुरूष एकाहून अधिक लैंगिक संबंध ठेवण्याची किंवा तशी कल्पना करण्याची शक्यता अधिक असते. यात भावनात्मक काही नसते, तर शारिरक ओढ असते.
फील गुड हार्मोन
मानवाच्या वर्तनाच्या अभ्यासक, संशोधक हेलेन फिशर म्हणाल्या की, पुरूषांमध्ये सेक्सचे आकर्षण अधिक असते तर महिलांमध्ये लैंगिक संबंधांची इच्छा आणि लैंगिक समाधान हे पुर्णतः भावनिक असते. अनेकदा महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि अॅस्ट्रोजन या संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे संतुलन ठेवणे अवघड होते. पण त्या आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवतात. अशा अवस्थेत पुरूष आणि महिलांची सेक्सबाबतची भूमिका बदलते. पुरूषांसाठी सेक्स फील गुड हार्मोन वाढवते.
प्रेम आणि लैंगिक समाधान
कॅलिफॉर्नियातील सॅक्रोमेंटो येथील मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट डॉ. निकोल प्र्युज म्हणाले की, पुरूष आणि महिला दोघेही जेव्हा प्रेमात पडून सेक्स करतात तेव्हा त्यांना मिळणाऱ्या समाधानाची पातळी उच्च असते. तर केवळ शारिरीक गरजेच्या पुर्तेतेसाठी केला गेलेला सेक्स केवळ काही काळ मानिसक समाधान देत असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.