Instagram New Feature: आजकाल इंस्टाग्राम हे अॅप सर्वाच्या मोबाइलमध्ये आहे. इंस्टाग्राम आपल्या यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. इंस्टाग्रामने Nighttime Nudge नावाचे हे नवीन फीचर लाँच केले आहे. हे फीचर अशा मुलांसाठी आहे जे इंस्टाग्रामचा खूप वापर करतात. इन्स्टाग्रामच्या या फीचरमुळे मुलांना रात्री उशिरापर्यंत फोन वापरण्यापासून रोखता येणार आहे.
हे फीचर ऑन केल्यानंतर ते मुलांना रात्री १० मिनिटांपेक्षा जास्तवेळ इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देणार नाही. ते दर 10 मिनिटांनी रिमाइंडर देत राहणार.
हे फीचर लाँच करताना इंस्टाग्रामने म्हटले आहे की, मुलांसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. प्रौढ असो वा लहान, प्रत्येकासाठी निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप महत्त्वाची असते. मुले रात्री उशिरापर्यंत फोन वापरू नयेत आणि वेळेवर झोपावेत यासाठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे.
इन्स्टाग्रामचे हे फीचर रील आणि डायरेक्ट मॅसेजसाठी काम करणार आहे. हे फीचर मुलांना अॅप बंद करण्यासाठी वारंवार रिमाइंडर देईल. याशिवाय, मेटाने असेही म्हटले आहे की ते मुलांच्या टाइमलाइनवरील कटेंट पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे फिल्टर करेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.