
Lumpy Virus Vaccine In India: भारतात अजूनही लम्पी आजाराचा कहर सुरुच आहे. या आजारामुळे लाखो गुरे मृत्युमुखी पडली आहेत. आजही गुरे या आजाराच्या विळख्यात आहेत, परंतु आता या आजाराला रोखण्यासाठी भारत बायोटेक ग्रुपची कंपनी बायोव्हेटने बायोलॅम्पिव्हॅक्सिन लस विकसित केली आहे. भारतात बनवलेल्या या पहिल्या लसीला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून परवाना मिळाला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून परवाना मिळाल्यानंतर पशुवैद्यकीय आरोग्य सेवेमध्ये स्वावलंबी भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. पूर्वी भारत परदेशी लसींवर अवलंबून होता, परंतु स्वदेशी लस बनवल्यानंतर आयात केलेल्या लसींवरील भारताचे (India) अवलंबित्व कमी होईल. ही नवीन स्वदेशी लाईव्ह अॅटेन्युएटेड मार्कर लस हिसार येथील इंडियन कॉन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च-नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इक्विन्स (ICAR-NRCE) च्या LSD विषाणू लसीच्या स्ट्रेनचा वापर करुन विकसित करण्यात आली आहे. 2022 मध्ये बंगळुरुस्थित बायव्हेटसह चार लस उत्पादकांना हे तंत्रज्ञान देण्यात आले.
लस उत्पादक बायोव्हेटने दिलेल्या निवेदनानुसार, बायोलॅम्पिव्हाक्सिन ही भारतातील पहिली एलएसडी लस आहे. ही संक्रमित प्राण्यांपासून जगातील सर्वात सुरक्षित आणि पहिली ओळखता येणारी (DIVA) मार्कर लस आहे. या लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता अनेक पातळ्यांवर तपासण्यात आली आहे. आयसीएआर-एनआरसीई आणि भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) येथे व्यापक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
बायोव्हेटने निवेदनात पुढे म्हटले की, ही लस रोग निर्मूलन कार्यक्रमांसाठी पशुवैद्यकीय औषधांसाठी एक गेम-चेंजर ठरेल. बायोम्पिव्हॅक्सिन एखाद्या प्राण्याला देता येईल की नाही हे आता तज्ञ आणि फील्ड वर्कर ठरवू शकतात.
कंपनीने सांगितले की, बायोलॅम्पिव्हाक्सिन लवकरच बाजारात येईल. बायोव्हेटच्या मल्लूर युनिटमध्ये तयार होणारी ही लस दरवर्षी 500 दशलक्ष डोस तयार करु शकते. लम्पी विषाणू हा एक सीमापार पसरणारा प्राण्यांचा आजार आहे, ज्याचा गुरांच्या आरोग्यावर (Health) आणि दुग्ध उद्योगावर परिणाम झाला आहे.
लम्पी स्किन डिसीज हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो गायी आणि म्हशींमध्ये होतो. हा डास, माश्या, गोचीड (लहान कीटक) आणि संक्रमित प्राण्यांच्या संपर्कामुळे पसरतो. यामुळे गुरांच्या शरीरावर गुठळ्या तयार होतात आणि त्यांना खूप ताप येतो. या आजारामुळे लाखो गुरांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो गुरे अजूनही या आजाराशी झुंजत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.