Health Tips: प्रोटिन सप्लिमेंट्स गरजेच्या आहेत का?

Importance Of Protein: प्रोटिन हे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे मूलभूत घटक आहे. केस, त्वचा, स्नायू, हाडे, हार्मोन्स, एन्झाइम्स आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

प्रोटिन हे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे मूलभूत घटक आहे. केस, त्वचा, स्नायू, हाडे, हार्मोन्स, एन्झाइम्स आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी प्रोटीन अत्यावश्यक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये प्रथिनांचा थेट सहभाग असतो. त्यामुळे प्रथिनांचा नियमित आणि योग्य प्रमाणात पुरवठा होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत बहुतांश लोकांना आहारातून पुरेसे आणि दर्जेदार प्रोटिन मिळत नाही. यामागे अनेक कारणं आहेत – शाकाहारी किंवा धान्यप्रधान आहार, आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा अभाव, आणि पोषणशास्त्राविषयी जागरूकतेचा अभाव. भारत हा ‘Protein-deficient nation’ (प्रथिनांचा अभाव असलेला देश) म्हणून ओळखला जातो, यावरूनच परिस्थितीची तीव्रता लक्षात येते.

कोणासाठी प्रोटिन सप्लिमेंट्स गरजेचे आहेत?

शाकाहारी व्यक्तींसाठी : त्यांच्या आहारात प्रथिनांचे मुख्य स्त्रोत म्हणजे डाळी, उसळी, चणा, पनीर, चक्का, दूध वगैरे; पण या सगळ्या अन्नघटकांमधून मिळणारं प्रोटिन प्रमाणात कमी आणि incomplete amino acid profile असलेलं असतं.

शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती : व्यायाम करणारे, खेळाडू, जिम जाणारे, किंवा दिवसभर ऊर्जेने भरलेलं काम करणाऱ्यांसाठी प्रथिनांची गरज जास्त असते. अशावेळेस, व्हे प्रोटिन घेतल्याने पटकन २३-२५ ग्रॅमचा फर्स्ट क्लास प्रोटिन सोर्स लगेच मिळतो.

वजन कमी करत असलेल्यांसाठी : वजन कमी करताना स्नायूंचा ऱ्हास होऊ शकतो, त्यामुळे प्रथिनांची पुरेशी मात्रा अत्यावश्यक असते. कधी कधी ती गरज आहारातून भागत नाही, म्हणून सप्लिमेंट घेतलेले चांगले.

Health Tips
Goa Taxi Drivers Protest: कॅब ॲग्रिगेटरला तीव्र विरोध! वाहतूक खात्यात टॅक्सी चालकांची झुंबड; बाबूश म्‍हणतात, रेंट अ कार, बाईक बंद करा; टॅक्‍सीवाले येतील नफ्‍यात

वृद्ध व्यक्ती व रजोनिवृत्तीनंतरच्या महिला : वय जसजसं वाढतं, तशी स्नायूंची ताकद कमी होते. हाडांची घनता कमी होते. अशावेळी प्रोटिन हे स्नायू व हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. वृद्धांसाठी दुधातून जरी व्हे प्रोटिन दिलं, तर त्यांचा प्रोटिन इन्टेक बरोबर होतो.

प्रोटिन सप्लिमेंट निवडताना काय लक्षात घ्यावे?

सप्लिमेंट घेताना त्याची गुणवत्ता आणि शरीराला फायदेशीर ठरणारे घटक तपासणे आवश्यक आहे :

Complete amino acid profile असलेलं प्रोटिन निवडावं.

पचनशीलता – शरीराला सहज पचणारे प्रोटीन (जसे की व्हे प्रोटीन concentrate, isolate किंवा प्लांट-बेस्ड blend).

कृत्रिम रंग, preservatives, fillers नसलेले, शक्यतो नैसर्गिक घटक असलेले सप्लिमेंट निवडावे.

Health Tips
Goa Crime: गरोदर महिलेला लोखंडी सळ्या, धारदार शस्त्रांने मारहाण, नवराही गंभीर जखमी; 25 जणांच्या टोळक्याविरोधात तक्रार

नैसर्गिक प्रथिनांचे स्रोत आणि त्यातील मर्यादा

प्रथिनांचे नैसर्गिक स्रोत म्हणजे अंडी, मासे, चिकन, मटण, दूध, ताक, पनीर, डाळी, कडधान्ये इ. मात्र वनस्पतिजन्य प्रथिनांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ, १०० ग्रॅम डाळीत फक्त २० ग्रॅम प्रथिने असतात, बाकी ८० ग्रॅम हे कर्बोदके असतात. त्यामुळे शुद्ध प्रथिनं मिळवण्यासाठी (मुख्यतः जे शाकाहारी आहेत) supplements उपयुक्त ठरतात.

जर तुमचा आहार योग्य प्रमाणात आणि दर्जेदार प्रथिनं देत नसेल, तर प्रोटिन सप्लिमेंट घेणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. विशेषतः शाकाहारी व्यक्ती, वजन कमी करणारे, वृद्ध, रजोनिवृत्तीनंतरच्या महिला आणि उच्च शारीरिक श्रम करणाऱ्यांनी प्रथिनांची गरज लक्षात घेऊन योग्य प्रोटिन सप्लिमेंट निवडावे.

प्रथिनांना पर्याय नाही – ते शरीराच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. त्यामुळे फंक्शनल मेडिसिन आहारतज्ज्ञाचाच सल्ला घेऊन प्रोटिनचा सप्लिमेंटचा समावेश आपल्या दिनचर्येत करणं, हे निरोगी आयुष्यासाठी आवश्यक ठरतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com