
जर गर्भधारणेदरम्यान बाळाच्या दोन्ही किडनीमध्ये यूरिन राहिल्याने सूज आली तर त्याला 'हायड्रोनेफ्रोसिस' आजार म्हणतात. हा आजार आई आणि न जन्मलेल्या बाळासाठी धोकादायक ठरु शकतो. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की योग्य काळजी आणि उपचारांनी हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. रोगाचे वेळेवर निदान झाल्यास मोठा धोका टाळता येतो. वैद्यकीय तज्ञ गर्भवती आई आणि बाळाला त्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात.
मेदांता-द मेडिसिटी (गुरुग्राम) येथील डायएट्रिक सर्जरी आणि पेडियाट्रिक युरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. संदीप कुमार सिन्हा सांगतात की, आजकाल दर 100 गर्भधारणेपैकी 1-2 अशी प्रकरणे दिसून येतात. आता गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) अधिक स्कॅन केले जात आहे, ज्यामुळे आगोदरच अशा प्रकरणांबद्दल माहिती मिळत आहे. जन्माच्या पहिल्या 5-6 महिन्यांत योग्य उपचार केल्यास बाळाची किडनी पूर्णपणे बरी होऊ शकते.
काही प्रकरणांमध्ये, समस्या किरकोळ असते आणि प्रसूतीपूर्व हायड्रोनेफ्रोसिस उपचारांशिवाय बरा होतो. गंभीर प्रकरणांमध्ये, बाळाचा अल्ट्रासाऊंड, व्हॉइडिंग सिस्टोरेथ्रोग्राम किंवा न्यूक्लियर मेडिसिन स्कॅन यासारख्या चाचण्या जन्मानंतर ब्लॉकेजची तीव्रता समजून घेण्यासाठी केल्या जातात. काही गंभीर प्रकरणांमध्ये तर शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
दुसरीकडे, अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रसूतीपूर्व देखरेख तंत्रांचा वापर करुन तसेच बाळाच्या जन्मानंतर बाळाला योग्य उपचार देऊन ही समस्या सोडवता येते. डॉ. सिन्हा यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान चांगले इमेजिंग आणि पीडियाट्रिक यूरोलॉजीतील प्रगतीमुळे या आजाराचे निदान आणि उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. महिलांना (Women) सल्ला दिला जातो की, जर त्यांना गर्भधारणेदरम्यान या आजाराशी संबंधित कोणतीही समस्या जाणवली तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. या बाबतीत निष्काळजी राहू नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.