Onions Store Tips: कांद्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये होतो. यामुळे काद्याशिवाय कोणताही पदार्थ बनवणे शक्य नाही. टोमॅटोपाठोपाठ आता कांदा देखील महाग होऊ शकतो. यामुळे कांद्याचे भाव वाढण्याआधी तो खरेदी करून काही महिने साठवून ठेवायचे असेल तर आम्ही काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही कांदा साठवून ठेऊ शकता. या टिप्स कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
टिश्यू पेपरचा वापर करावा
तुम्हाला कांदे जास्त दिवस साठवून ठेवायचे असेल तर तुम्ही कांदा टिश्यू पेपरमध्ये अलगद गुंडाळून कापड किंवा ज्यूटच्या पिशवीत थंड ठिकाणी ठेऊ शकता. हे लक्षात ठेवा ही पिशवी फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
अशा पद्धतीने साठवणुक केल्यास ६ महिने खराब होणार नाही
जर तुम्हाला 6 महिने किंवा त्याहून जास्त दिवस कांदा साठवून ठेवायचा असेल तर तुम्ही करू शकता. यासाठी आवश्यकतेनुसार कांद्याचे मध्यम काप करावेत. नंतर ते तपकिरी होईपर्यंत तेलात तळून घ्यावे आणि हवाबंद डब्यात ठेवावे.
फ्रिजमध्ये कापुन ठेवावे
कांदा कापल्यानंतर तुम्ही तो फ्रिजमध्ये सुमारे 15-20 दिवस ते 3 महिने ठेवू शकता. यासाठी कांद्याचे लहान तुकडे करावे. नंतर 5-10 मिनिटे हवेशीर ठेवावे. नंतर हवा बंद डब्यात ठेवावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे.
या गोष्टी ठेवा लक्षात
प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कांदा साठवू नका.
फ्रिजमध्ये सालासह कांदा ठेवणे टाळावे.
कांद्याला कोंब आले असेल तर ते वापरून टाकावे.असे कांदे साठवून ठेऊ नका.
काळे डाग असलेल्या कांद्याची वर्गवारी करा.
कांदे साठवून ठेवतांना मोठे आणि कोरडे कांदे घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.