Healthy Tips: ग्रीन टी, कॉफी किंवा चहा पिणे चांगले काय आहे? जाणून घ्या कधी प्यावे

चहा आणि कॉफी प्रेमींसाठी या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
Healthy Tips:
Healthy Tips:Dainik Gomantak

healthy tips coffee tea green tea which is more healthy know about best time for drink

अनेक लोक दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. अनेकांना चहा प्यायला आवडते तर काहींना कॉफी. चहा-कॉफी मिळाली नाही तर दिवसाची सुरूवात होत नाही. अनेकांना चहा आणि कॉफीची इतकी आवड असते की ते दिवसातून अनेक कप पितात. 

चहा, कॉफी आणि ग्रीन टी या तिघांपैकी कोणता चांगला आहे हे तुम्हाला माहीत आहे का? सकाळी चहा, कॉफी आणि ग्रीन टी या तिन्ही पेयांमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते. यापैकी कोणते पेय आरोग्यासाठी चांगले आहे ते जाणून घेऊया.

Green Tea
Green TeaDainik Gomantak

ग्रीन टी


ग्रीन टीमध्ये 47 मिलीग्राम कॅफिन असते. हे पचनासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर सकाळी दुधाचा चहा न पिता ग्रीन टी पिण्यास सुरुवात करावी. खाल्ल्यानंतर तुम्ही एक कप ग्रीन टी घेऊ शकता.

Tea
Tea Dainik Gomantak

चहा


जर तुम्हाला पचन आणि पोटाशी संबंधित समस्या असतील तर चहा पिणे टाळावे. कारण त्यामुळे पचनक्रिया मंदावते. जर तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटत असेल तर तुम्ही कॉफीऐवजी चहा पिऊ शकता. अनेक लोकांना दिवसभरात 5-6 वेळा चहा पिण्याची सवय असते. दिवसातून फक्त २ वेळा चहा घेऊ शकता.

Coffee
Coffee Dainik Gomantak

कॉफी


कॉफी शरीराला सक्रिय ठेवण्याचे काम करते. कॉफी देखील स्नायू आणि मन शांत करते. एक कप कॉफीमध्ये 95 मिलीग्राम कॅफिन असते. तुम्ही सकाळी थोड्या प्रमाणात कॉफी पिऊ शकता. पण कॉफी प्यायल्यानेही ॲलर्जी होऊ शकते, जर तुम्हाला त्याची ॲलर्जी असेल तर पिणे टाळावे. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी कॉफी पिणे टाळावे. कॉफी प्यायल्याने झोपेशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. निद्रानाशाची समस्या असणाऱ्या लोकांनी कॉफी पिणे टाळावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com