Painkillers in Periods : तुम्हीही पीरियड्समध्ये पेनकिलर्स घेता? मग वेळीच व्हा सावधान! त्याऐवजी वापरा हे घरगुती उपाय

Painkillers for Period Pain : पोटदुखी, पाठदुखी, मूड बदलणे अशा अनेक गोष्टी या दिवसात घडत असतात.
Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
Published on
Updated on

स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही अशी प्रतिक्रिया आहे जी वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू होते आणि 50 वर्षांपर्यंत टिकते. हे दर महिन्याला 3 ते 7 दिवस चालते. प्रत्येक मुलीला मासिक पाळी दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, पाठदुखी, मूड बदलणे अशा अनेक गोष्टी या दिवसात घडत असतात. यादरम्यान, अनेक मुली आणि स्त्रिया पेनकिलर्स घेतात. पण खरंच सतत पेनकिलर्स घेणे योग्य आहे का? इथे सविस्तर जाणून घ्या.

(Painkillers for Period Pain)

मासिक पाळीच्या वेदनेपासून मुक्त कसे व्हावे?

मासिक पाळीच्या दरम्यान ओटीपोटात तीव्र वेदना होत असतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीदरम्यान पोटदुखी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पीरियड डाएटमध्ये मनुके, केशर आणि तूप यांसारख्या साध्या स्वयंपाकघरातील घटकांच्या मदतीने मासिक पाळीच्या वेदनांवर मात केली जाऊ शकते.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • मनुका आणि केशराने वेदना दूर करा

दोन लहान वाट्या घ्या. एकामध्ये काळे मनुके (4 किंवा 5) आणि दुसऱ्यामध्ये केशर (1-2) ठेवा. सकाळी त्यांचे सेवन करा. हे पीरियड क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगच्या समस्येसाठी उत्तम आहेत. हे बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि लोहाची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करू शकते.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • पेनकिलरची टाळा

मासिक पाळीत अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या प्रत्येक स्त्रीला त्रास देतात. परंतु सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओटीपोटात तीव्र वेदना. यापासून आराम मिळण्यासाठी महिला वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात. जे पुढे जाऊन त्यांचे नुकसान करू शकते. त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या प्रमाणात पेनकिलर घेऊ नये.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड

गरम पाण्याच्या पिशवीत, हीटिंग पॅडमध्ये किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरा आणि पोट आणि पाठीचा भाग सुमारे 10-15 मिनिटे शेका. मासिक पाळीच्या वेळी वेदना कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधांप्रमाणेच गरम पाण्याचे कॉम्प्रेस कार्य करते.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • हिंग खा

मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखी आणि इतर समस्यांमुळे तुम्हालाही खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही हिंग खावे. ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे, जी तुमच्या पोटाच्या खालच्या भागाच्या स्नायूंना बळकट करण्यास, त्यांची लवचिकता वाढवण्यास आणि मासिक पाळीच्या दरम्यान वेदना निर्माण करणारी कारणे दूर करण्यास मदत करते.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • मेथी दाणे देखील आहेत फायदेशीर

तुमच्या मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी 12 तासांपूर्वी मेथी पाण्यात भिजवून ठेवावी, त्यानंतर मेथी गाळून त्याचे पाणी प्यावे.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • जास्त पाणी प्या

पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. पोट फुगण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे. याशिवाय चहा किंवा कॉफीचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak
  • हिरव्या भाज्या खा

जेवणात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक खा. या गोष्टींमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.

Painkillers for Period Pain
Painkillers for Period PainDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com