Health Benefits Of Desi Ghee: शुद्ध शाकाहारी जेवणात तुपाचे महत्व अनन्यसाधारण आहे. वरण-भात आणि साजूक तूप हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. तूपाचे शरीरासाठी असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत.
अगदी तजेल त्वचेपासून ते गुडघ्याची झिज भरून काढेपर्यंत सगळीकडे तुपाचा फायदा होतो. तूप हे लोणी कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे आणि असे पारंपारिक पद्धतीने लोण्याचे रवाळ दाणेदार साजूक तूप खायला प्रत्येकालाच आवडतं.
मात्र तूप हे देशी गाईच्या दुधापासून तयार केलेलं असावं. कारण देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप मधुमेहात मदत करते. याचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो.
ज्याच्या मदतीने चयापचय दर दुरुस्त होतो. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही दुपारच्या जेवणात करू शकता.
हेल्दी राहण्यासाठी नेहमीच हेल्थ एक्सपर्ट्स दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करण्याचा सल्ला देतात. यात पोट, त्वचा आणि केसांची वाढ चांगली होते.
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे...
1) सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमची हाडे मजबूत होतात. तसेच याने शरीरातील न पचलेले पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते.
2) सोबतच त्वचा चांगली राहते. इतकंच नाही तर जॉइंट्समध्ये होणारी वेदनाही दूर होते. याने चेहऱ्यावर मुलायमपणा कायम राहतो.
3) रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने वजन वेगाने कमी होतं.
4) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट राहतं. डिटॉक्ससाठीही तूपाचं सेवन फार चांगलं मानलं जातं. तेच
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.