Itchy Scalp Treatment: स्कॅल्पवर येणारी खाज 'अशी' करा झटक्यात दूर

अनेक लोकांना स्कॅल्पवर खाज येण्याची समस्या असते. ते कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गो,्टींचा वापर करू शकता.
Itchy Scalp Treatment
Itchy Scalp TreatmentDainik Gomantak
Published on
Updated on

hair care tips itchy scalp treatment try these tips read full story

प्रत्येकाला सुंदर केस आणि मजबुत केस हवे असतात. दररोज केसांची निगा राखणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठी दररोज विविध तज्ञांचा सल्ला घेतो. यासाठी तुम्हाला अनेक मोठ्या ब्रँड्सची अनेक प्रोडक्ट बाजारात मिळतील. अनेक लोकांना टाळूला खाज सुटण्याची समस्या असते. ती कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

केसांसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. तुमच्या केसांचे योग्य पोषण करण्यासाठी आणि टाळूची खाज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती वस्तू वापरू शकता. यासाठी तुम्ही कोरफड जेल, दही अशा इतर गोष्टींची मदत घेऊ शकता.

केस धुताना या गोष्टी ठेवा लक्षात

केस धुण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणे टाळावे. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले शैम्पू आणि कंडिशनर वापरावे. केस धुताना, टाळूमध्ये शॅम्पूने नीट मसाज करा जेणेकरून टाळूमध्ये साचलेले तेल स्वच्छ होईल आणि टाळूच्या त्वचेतील घाण योग्य प्रकारे निघून जाईल.

केसांना हायड्रेट कसे ठेवावे

बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे केस खराब होतात. तसेच केसांमध्ये कोरडेपणा मोठ्या प्रमाणात वाढतो. केसांना योग्य पोषण देण्यासाठ त्यांना हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही हेअर सीरम, हेअर मास्क अशा अनेक गोष्टी वापरू केसांची काळजी घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com