आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. वर्षाचा पहिला गुरूवारी भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल तर पुढील काही उपाय करू शकता. यामुळे घरात सुख- समृद्धी लाभेल.
आज वर्षाचा पहिला गुरुवार आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी आणि भगवान विष्णूची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी आज भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा.
भगवान विष्णूची कायम कृपा राहावी असे वाटत असेल तर या दिवशी विष्णु सब्सनाम्चा पठण करावे. असे मानले जाते की विष्णु सबस्ननामचा पाठ केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.
गुरुवार हा खास दिवस आहे. गुरुवार हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार, सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात मोठा असलेल्या गरुडाने गुरुवारीच भगवान विष्णूची पूजा करून त्यांना प्रसन्न केले.
गरुडाच्या यशस्वी तपश्चर्येमुळे गुरुवार हा दिवस भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित करण्यात आला. त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला भगवान विष्णूची कृपा मिळवायची असेल आणि तुमच्या कुंडलीत गुरूचा दोष असेल तर दर गुरुवारी शिवाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
वर्षातील पहिला गुरुवार खास बनवा आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी वरील उपाय करू शकता.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.