Goa: पाणीच पाणी चहुकडे!

Goa : राज्यात मुुसळधार पावसामुळे पुरस्थिती (Flood) निर्माण झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले, याला जबाबदार कोण

Goa: Obstruction caused by torrential rains
Goa: Obstruction caused by torrential rainsDainik Gomantak
Published on
Updated on

‘नेमेची येतो, मग पावसाळा’ असं त्याचं येणं हे जरी आपल्यासाठी गरजेचं असलं, तरी त्याचं अति बरसणं, (Heavy rain) हे आपत्तीजनकच असतं. हे सध्याची परिस्थिती पाहता म्हणावं लागेल. गोव्यात (Goa) तुडूंब वाहणाऱ्या नद्यांनी (River) धोक्याची पातळी ओलांडली, पूल, शेती, रस्ते, घरे पाण्याखाली गेले. दरडी कोसळल्या घरे जमीनदोस्त झाली. गावांचा एकमेकांपासून संपर्क तुटला, वीज-पाणी रहदारी बंद घाट मार्ग बंद झाले. पुराची गंभीर परिस्थिती उद्‌भवली, धरणाचे दरवाजे उघडल्याने गावेच्या गावे पाण्याखाली गेली, अतिवृष्टीमुळे समुद्राला आलेली भरती, पाण्याच्या पातळीत वाढ, परिसर जलमय, घराघरांत पाणी शिरल्याने लोकांचे हाल आहे. थे वाहतूक ठप्प अशा बातम्यांनी पेपरचे भरलेले रकाने आणि टीव्हीवर दाखवले जाणारे लाईव्ह टेलिकास्ट यामुळे सर्वच लोक हवालदिल झालेत.
यंदा पाऊस सुरवातीलाच इतका प्रचंड प्रमाणात पडलाय, यात शंकाच नाही, पण सगळे खापर आपण निसर्गावर फोडून आपण पुन्हा नामा निराळे रहातो. याचा उपयोग नाही निसर्गक्रमात माणसाने केलेली लुडबूड याचा हा परिणाम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या साथी निदान पुढच्या वर्षी तरी अशी वेळ येवू नये, म्हणून खबरदारी घ्यायला हवी. पावसावर अशी आलेली वेळ ही माणसाचीच करतूत आहे.
आपल्याच देशात हे घडतंय असं नाही, तर परदेशात सुद्धा हीच परिस्थिती थोड्या कमी अधिक प्रमाणात दिसून येतेय. त्याची करणे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असतील. उदाहरणार्थ चीनमध्ये आलेला पूर. आणि दरवर्षी जलमय होणारी त्यांची भूमी, त्यांनी अगणित अशी नदीवर धरणे बांधून पाण्याला अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला तोच त्यांच्या अंगाशी आलाय. तर जर्मनीमध्ये कारखान्यात कोळशाच्या वापराने होणारे प्रदूषण त्याचे परिणाम म्हणजे अचानक आणि अफाट असा पावसाचा मारा आणि नद्यांना येणारे पूर. हवामानातील बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे मुख्य कारण ठरत आहे. हवामान बदल जग तापतं आहे. आणि ते माणसामुळे होतेय कोळसा डिझेल पेट्रोल जास्त वापरतो. दाट जंगलात वणवे पेटत आहेत, त्यामुळे जंगल संपत्ती नष्ट होऊ लागले आहे, बर्फाच्या वितळण्यामुळे नद्यांना येणारे पूर कार्बन तयार होतोय, जो घातक ठरतो, त्याचे प्रमाण वाढतच आहे. तापमान वाढवला जातं, त्याचं बाष्पीभवन होऊन एकदम जोरात पाऊस पडतो, ढगफुटी सारखा किंवा कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने पूर येतोय. हवेतला धूर आणि धूळ अशी परिस्थिती निर्माण होते.


Goa: Obstruction caused by torrential rains
Goa Floods: समुद्राच्या पाण्याला रोखणार कोण?

भारतात अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसते. आपण मोठ्या प्रमाणात गाड्या वापरतो, त्यामुळे हवेत धुराचे प्रमाण वाढतेय. त्यासाठी ठिकठिकाणी झाडे वाढवली पाहिजे, जी कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन देऊ शकतील. आहेत ती झाडे तोडली जाणार नाहीत, हे पाहिले पाहिजे. इंधनाचा वापर कमी प्रमाणात केला गेला पाहिजे. हल्ली ऋतूंचे चक्र हे आपले वेळापत्रक बदलताना दिसू लागलेत. हा वातावरणातील बदलाचा परिणाम आहे, हे संशोधना अंती सिद्ध झालेय, पूर्वी पण इतका पाऊस होत होता, पण एकदम एकसारखा कोसळत राहून नुकसान करत नव्हता. पण आता हवेतलं, बाष्पाचं प्रमाण वाढतयं त्यामुळे तो जोरात येतो. गरम हवा वर जायला हवी तसतशी वाफ थंड होऊन पाऊस पडतो, पण शहरात गावात सिमेंटची जंगले वाढत आहेत, ती जास्त तापतात. जमीन जास्त तापते. आपला देश म्हणजे ‘अर्बन हिट आयलंड’ (शहरी उष्णतेचे बेट) बनला आहे. गरम हवा जेव्हा वर जाऊ पहाते तेव्हा हवेतले धुळीचे धुराचे कण यामुळे बाष्प तयार होते ते एकत्र येऊन पाऊस ढग तयार होतात आणि खूप जास्त मुसळधार पाऊस पडतो. तर तिकडे उत्तर परदेशात हिमालयातून गोठलेल्या बर्फाच्या नद्या तापमानाने वाढीमुळे वितळू लागल्यात. त्यामुळे नद्यांना पुर येतात तर कुठे ढग फुटी होताना दिसते. तर काही ठिकाणी ठिकठिकाणी ओढे नाले बुजवून त्यावर लोकांनी घरे बांधली मोठमोठे प्रकल्प उभारले त्यामुळे उंचावरून येणारे पाणी आहे तिथेच साचू लागले. त्यांची ओढे नाल्यांची वाटच बंद करून टाकली. तर काही ठिकाणी नदीच्या अगदी किनारी काठावर घरे बांधून बांधून तिचे पात्रंच लहान करून टाकले ती जेव्हा मोठे रौद्र रूप धारण करून येते तेव्हा काठावरचे सगळेच वाहून नेते यात तिलाच दोष दिला जातो, पण लोकांनी नदी काठी भराव घालून वाट्टेल तशी केलेली बांधकामे आणि पुर रेषेच्या आत केलेले अतिक्रमण हे त्याला कारणीभूत ठरते. हे मी उत्तर प्रदेशात केदारनाथ येथे आलेल्या पुराच्या वेळी पाहिले होते. नदीच्या दोन्ही काठांवर रिव्हर ‘व्हयू’च्या गोंडस नावाखाली घरे, लॉजेस बांधल्याने तिची कक्षा रुंदी अरुंद करून टाकली होती. पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्रोत बंद केले गेले त्यावर घरे इमारती बांधल्या गेल्याने जिथे जागा मिळेल तिथे पाणी घुसण्याचा प्रयत्न करते. नद्या आपल्या बरोबर वाटेतला गाळ खडक, माती सगळंच बरोबर घेऊन वाहत येतात अशा नदीने आणलेल्या गळणे तिचे पात्र उथळ बनते अशावेळी तो नदीचा गाळ उपसला गेला नाही तर ते पाणी दुथडी भरून वाहू लागते आजूबाजूला सगळीकडे पसरत जाते.


Goa: Obstruction caused by torrential rains
Goa: कोरोनाने घालून दिलेले धडे

डोंगर कापण्याने, तसेच माळरानावर प्रदूषण करणारे प्रकल्प उभारणे, यामुळे निसर्गाच्या उपक्रमात हस्तक्षेप केला जातो. नदी किंवा समुद्र शेवटी माणसाने जे दिले ते परत करत असते. प्रदूषण होईल, असा घाण घनकचरा, गाळ, सांडपाणी सारे परत गावात पसरते त्यामुळे रोगराई निर्माण होते. शहरात, गावात तुंबलेले पाणी परत माघारी जात नाही, ते साचून राहिल्याने डास होतात रोगराई पसरते. बरेच ठिकाणी गटारे साफ नसल्याने ते पाणी आत ड्रेन होऊ शकत नाही. अतिक्रमणे सहन करणारी नदी अतिवृष्टीने भरून वाहू लागते, तेव्हा माणसाने जे तिला दिले त्या सगळ्याची परत फेड करते. साचलेले पाणी रस्त्यांवर भरून रहातं त्यासाठी वेळच्या वेळी गटारे स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे. मुंबईत त्यामुळेच दरवर्षी मुंबईची तुंबई होताना दिसते. त्या वाढलेल्या पाण्याला जायला जागा मिळत नाही ते त्यामुळे साचून रहातं. औद्योगिक वसाहती कारखान्यातून सोडले जाणारे दूषित केमिकल युक्त पाणी सोडले जाते त्यामुळे नदी म्हणजे गटार होऊन जाते. प्रत्येक भागाची भौगोलिक अशी रचना असते. काही उंच तर काही सखल सपाट तर कुठे जरा खोलगट असते. त्या त्या ठिकाणी योग्य अशी पाणी निचऱ्याची व्यवस्था व्हायला हवी. केरळमध्ये आलेल्या पुराला कारण तिथे झालेली जंगल तोड हे होते, तिथे लोकांनी जंगलातली झाडे मारून तिथे घरे बांधली चहाचे मळे लावले, पण जास्त पावसाच्या माऱ्याने जमिनीचे भूस्खलन झाले, मूळची जी वृक्ष राजी असते, ती जमीन मुळांमुळे घट्ट धरून ठेवणारी होती, माती धरून ठेवते, त्यामुळे मातीची धूप होत नाही. बेसुमार वृक्ष तोड आणि डोंगर कापले जात आहेत हे पर्यावरणासाठी घातकच ठरतील.
अनिर्बंध बांधकामामुळे हे संकट अधिकच गडद होत जाईल. निसर्गातले नद्या,नाले, डोंगर समुद्र तलाव खाड्या जे काही आहे, त्यांचा एकमेकांशी परस्परसंबंध जोडलेला आहे. त्यांना धोका देवून जर काही मानवाने केले, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील आणि अशा ऱ्हास होण्यात नागरीकरण शहरीकरण आणि राजकारण हे ही तितकेच करणीभूत ठरतील. वेळीच उपाययोजना करून आणि सावध पुढल्या हाका यांचा विचार करून केलेली अभ्यासपूर्ण शहर रचना दर वर्षीची ही काळजी दूर करू शकेल आणि ‘मग नेमेची येतो, मग पावसाळा’ तो सुखद असेल.


Goa: Obstruction caused by torrential rains
Goa: आला पाऊस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com