अनेक लोकांना वॉटर स्पोर्ट्स खूप आवडतात. पाण्यावर मस्ती करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. बोटिंगपासून ते स्कूबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, रिव्हर राफ्टिंगपर्यंत सुट्टीच्या दिवशी अनेक जलक्रीडेचा आनंद घेतात.
मात्र, याशिवाय काही काळापासून फ्लायबोर्डिंगलाही खूप पसंती दिली जात आहे. साधारणपणे, फ्लायबोर्डिंग हे कतारपासून थायलंडपर्यंत खूप प्रसिद्ध आहे. पण आता भारतातील लोकही या जलक्रीडेचा आनंद घेऊ लागले आहेत. फ्लायबोर्डिंगचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही गोव्यातील बीचला भेट देऊ शकता.
बागा बीच
बागा बीचवर फ्लायबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या दृश्य पाहून हरवून जावू शकता.
अंजुना बीच
बागा बीच व्यतिरिक्त अंजुना बीचवरही फ्लायबोर्डिंगचा अनुभव घेता येतो. अंजुना बीचवर आरामशीर वातावरण आणि फ्लायबोर्डिंगची साथ सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करते.
कळंगुट बीच
कळंगुट बीचला गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांची राणी म्हटले जाते. हे ठिकाण फ्लायबोर्डिंगसाठी योग्य मानले जाते. तुम्ही जर गोव्यात असाल तर तुम्हाला फ्लायबोर्डिंगचा थरार नक्कीच अनुभवता येईल. त्याचबरोबर कळंगुटचे नैसर्गिक सौंदर्यही तुम्हाला भुरळ घालेल.
दोना पावला
दोना पावलामध्ये फ्लायबोर्डिंगचा आनंदही घेता येतो. पणजीपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले दोना पावला हे उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर बीच म्हणूनही ओळखले जाते. गोव्यात येणारे पर्यटक दोना पावला येथे निसर्ग सौंदर्यांचा आनंद घेतात.
भारतात या ठिकाणीही घेऊ शकता आनंद
गोवा हे भारतातील सर्वोत्तम फ्लायबोर्डिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. येथे अनेक ठिकाणी फ्लायबोर्डिंगचा अनुभव घेऊ शकता. परंतु याशिवाय तुम्ही केरळ, अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या ठिकाणी तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमधील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर देखील फ्लायबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.