Diwali 2023: दिवाळी सणांमागील शास्त्र आणि भारतीय परंपरा (भाग 1)

या लेखमालेत आयुर्वेदिक आणि धार्मिकदृष्ट्या दिवाळीचे महत्व विशद करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Diwali
DiwaliDainik Gomantak

Diwali 2023 दिवाळीला सुरुवात झालीय. दरवर्षी आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीला धार्मिक अनुषंगाने जसं महत्त्व आहे तसेच आयुर्वेदिकदृष्ट्याही महत्व आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच अभ्यंगस्नान, फराळ, लक्ष्मीपूजन या कार्यक्रमांवर भर दिला जातो. खरं तर आयुर्वेदिक उपचार पद्धतीत नित्य नियमाने 'अभ्यंगस्नान' करावे असे सांगितले आहे. साहजिकच त्यामुळे प्रातःकाळी उठण्याची सवय लागते आणि दिवसाची सुरुवातही उत्साहवर्धक होते.

  • अभ्यंगस्नानाचं महत्त्व :-

अभ्यंगस्नानाचं 'हे' स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर केले जाते. निसर्ग नियमानुसार या कालावधीमध्ये माणसाच्या शरीरात वाताचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सर्वांगाला तेलाने मालिश करून गरम पाण्याने अंघोळ केल्यास वाताचे शमन होण्यास मदत होते.

तसेच तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरणं सुद्धा योग्य पद्धतीने होते. वातामुळे स्नायू आखडणे, अवयवांना कंप सुटणे हे आजार दूर होण्यास मदत होते. थकवा, मानसिक चिडचिडेपणा अशा आजारांवर अभ्यंगस्नान करण्याचा सल्ला वैद्य देतात.

Diwali
क्रिप्टो करन्सी, फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावाखाली 2,500 कोटींची फसवणूक; गोवा, गुजरातसह विविध राज्यात जाळे
  • तेल आणि उटणे :-

अभ्यंगस्नानाकरीता जे तेल वापर जाते त्याचेही आयुर्वेदात महत्व सांगितले आहे. अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. काही ठिकाणी तिळाचे, खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते.

तेलामुळे कांती मुलायम होण्यासोबत त्याचा हाडांनाही मोठा उपयोग होतो. स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी नियमित अंगाला तेल लावून स्नान करण्याचा सल्ला दिला जातो.

उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत असलेली त्वचा मऊ राहते. उटण्यातील नागरमोथा, मुलतानी माती, आंबे हळद, मसूर डाळ, जटामासी, वाळा या औषधी चूर्णांचे मिश्रण त्वचेसोबतच मनालाही आल्हादायक बनवते.

Diwali
Vice President Goa University Visit: उपराष्ट्रपतीची गोवा विद्यापीठाला सप्राईज भेट, स्वच्छतेचा घेतला आढावा
  • फराळापूर्वी:-

दिवाळीतल्या नरकचतुर्दशीच्या पहाटे उठल्यावर सर्वप्रथम सप्तपर्णी (सातविण हे नाव कोकणी बोलीभाषेत दिले गेले आहे) या वृक्षाच्या सालीचा रस काढून तो ताकासोबत पिण्याची पद्धत आहे. ही प्रथा गोव्यासह लगतच्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील गावात आजही पाळली जाते.

ओवा, हिंग, सैंधव या सर्वांच मिश्रण ताकत मिसळून त्यात सातविण वृक्षाच्या सालीचा रस मिसळून २-३ चमचे रिकाम्यापोटी दिला जातो. याची चव अप्रतिम लागते. मलेरिया, अल्सर, अस्थमा, सर्पदंश, त्वचारोग अशा आजरांवर सप्तपर्णी वापरतात.

(सप्तपर्णी हे अस्सल भारतीय वंशाचे झाड आहे. Alstonia Scholaris हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. सप्तपर्णी हे संस्कृत नाव असून सातविण हे नाव कोकणी बोलीभाषेत दिले गेले आहे. याचाच अपभ्रंश होवून सांतान, सातीण असंही काही ठिकाणी म्हटले जाते. भारतात आयुर्वेदात पंचकर्म शुद्धीसाठी सप्तपर्णी खोडाची साल वापरली जाते.)

फराळासाठी पोहेच का?

पोहे हे चवदार तसेच पौष्टिक अन्न असल्याचे सर्वत्र प्रसिद्ध आहे. पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. पोह्यांचे सेवन केल्याने दिवसभर अंगात एनर्जी टिकून राहते.

तसेच बीपीच्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे पोहे पचनासाठी चांगले समजले जातात. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि फायबर्समुळे पचनशक्ती मजबूत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com