Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना

लाकडी मखरात कप्पे ठेवून, त्यात हिंदू धर्मातल्या लोकप्रिय देवतांच्या चौकटीने भिंतीची शोभा वृद्धिंगत व्हायची.
Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना
Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जातानाDainik Gomantak

एके काळी गोव्याच्या प्रत्येक गावात वसलेल्या ‘मेस्तावाड्या’ वरचे कारागीर सागवान, शिसवीसारख्या टिकाऊ लाकडाचा वापर करून कलात्मकतेने मखराची निर्मिती करायचे. या लाकडी मखरात कप्पे ठेवून, त्यात हिंदू धर्मातल्या लोकप्रिय देवतांच्या चौकटीने भिंतीची शोभा वृद्धिंगत व्हायची.

काही संयुक्त कुटुंबात गणपतीला आसनस्थ करण्यासाठी अशा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या मखरांचा आजही उपयोग केला जातो. गणेशोत्सवात वापर झाल्यानंतर ही मखरे पुन्हा व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवली जातात. चतुर्थीत गणपतीचे आगमन होण्यापूर्वी ही मखरे बाहेर काढून त्यांची साफसफाई होते. एखादा भाग अथवा एखादे चित्र खराब झाल्यास त्याजागी नवीन चित्र बसवले जाते. काही मखरे नव्या रंगांनी सजतात तर काहींना रंगीत कागदांच्या कलाकृती करून त्याद्वारे सजवले जाते.

Ganesh Festival: एक समृद्ध वारसा अडगळीत जाताना
Ganesh Chaturthi Special 2021: गोंयचो गणपती दर्शन

सागवान किंवा शिसवीचे लाकूड मूल्यवान आणि टिकाऊ असल्याने त्यांचा वापर शेकडो वर्षे होऊ शकतो. गोव्याच्या भूमीत पूर्वापार काष्टशिल्पकलेला जो वारसा आहे त्याचे दर्शन अशा मखरांतून होते. केवळ साफसफाई, रंगरंगोटी आणि नाममात्र सजावट करून असे मखर उत्सवासाठी सिद्ध होते. आजच्या नव्या पिढीला प्लास्टीक, थर्माकोलसारख्या आकर्षक (पण प्रदूषणकारी) मखरांची मोहिनी पडल्याकारणाने गोव्यातल्या कलाकारांचा हा समृद्ध वारसा विस्मृतीत जात आहे. उच्च दर्जाच्या कलाकुसरीने युक्त अशी ही लाकडांची मखरे अडगळीत पडू लागली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com