Ganesh Festival 2021: गावच्या गणेशाची ओढ

वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने गावांत जाणे होतेच; परंतु मुक्कामाला जायचे ते चतुर्थीलाच.
Ganesh Festival 2021: गावच्या गणेशाची ओढ
Ganesh Festival 2021: गावच्या गणेशाची ओढ Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कडधान्ये, भाजी, माटोळीच्या खरेदीनंतर साटली पोटली गाडीत टाकून गांवाकडे चवथीला जाण्यासाठी शहरातील गोमंतकीय सुसज्ज झाले आहेत. नोकरी व्यवसायानिमित्त सत्तरी ते काणकोणपर्यंतचे गोमंतकीय पणजी, मडगावात निवास करतात; पण चतुर्थी जवळ आली की त्यांना वेध लागतात गावच्या घरातील गणपतीचे. गावांतून शहरात पोचलेल्या गोमंतकीयांची संख्या लाखोंच्या घरात जाते, काहींनी आता शहरात, उपनगरात फ्लॅटस घेतले आहेत, बंगले बांधले आहेत तर काहींचा निवास सरकारी वसाहतीतील जागेत किंवा भाड्याच्या घरात असतो. वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने गावांत जाणे होतेच; परंतु मुक्कामाला जायचे ते चतुर्थीलाच. गांवातला गणपती दीड दिवसांपेक्षा पाच, सात दिवसांचा असतो.

Dainik Gomantak

सुट्टी मिळाल्यास बायको पोरांसह गणपती विसर्जनापर्यंत गांवातच मुक्काम अथवा ये-जा करायची असा बेत. गोव्यातल्या कांही गांवचा जुना साज, पूर्व परंपार रुप अगदी शंभर टक्के नसले तरी पन्नास टक्के टीकून आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणे हा असाच गाव. जेथे सिमेंट काँक्रीटच्या जंगलापेक्षा कौलारू घरेच जास्त प्रमाणात आढळतात. काही कुटुंबांच्या घरांना टाळे असले तरी चतुर्थी, गावातील देवतार्जनानिमित्त घरे उघडली जातात, साफसफाई होते आणि गजबज वाढते. संयुक्त कुटुंब पद्धती मोडीत निघाल्यामुळे चार भावांची चार घरे झाली तरी चतुर्थीत सगळे गणपती पुजनापुरते एकत्र येतात. चार गावांत विखुरलेली सख्खी, चुलत भावंडे आवर्जून विघ्नहर्त्याला नमस्कार करण्यासाठी चार चौकांच्या (वासऱ्यांच्या) पुरातन घरांत य़ेतात. जाणती मंडळी घरांतील कुरकुटाची ओळख मुलांना करून देतात. शंभर सव्वाशे वर्षांच्या जुन्या घरांची डागडुजी झाली, शौचालये, न्हाणीघरे आली, वीज व पाणी जोडणी मिळाली तरी कौले गायब झालेली नाहीत.

Ganesh Festival 2021: गावच्या गणेशाची ओढ
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर

घरात कोणी राहात असल्यास ठीक नाहीतर गॅसच्या शेगडी, सिलिंडरसह बाडबिस्तारा घेऊन तीस वर्षांपूर्वी आमोणेला फेरीबोटीतून जाणे म्हणजे एक दिव्यच असायचे, मात्र आमोणे पूल झाल्यानंतर प्रवास सुकर झाला. गवंडाळी पुलामुळे तर अर्ध्या तासात पणजी गाठणे शक्य होते. गणपती स्थानापन करायचे साल (हॉल) पताकांनी सजवायचे, पारंपरिक किंवा नंतर घरात समाविष्ट करण्यात आलेल्या बाप्पाच्या मेजाला रंगीबेरंगी कागद (फोली) डकवायच्या, छताच्या चौकटीला माटोळी बांधायची आणि बाप्पांच्या स्वागताला तय (हरितालेकिदीनी) सुसज्ज व्हायचे. चवथी दिवशी पूर्वी पहाटे चार वाजता फटाके वाजत असत, विसर्जनाला फटाक्यांच्या माळा काठीला टांगून वाजवल्या जात; परंतु आता ते प्रस्थ कमी झाले आहे. बाप्पांच्या आगमनाचा मुहूर्त सकाळच्या प्रहराचाच, एकदा बाप्पांची स्थापना झाली की मग नेवऱ्या मोदक पातोळ्यांचे गंध सुटेपर्यंत महिलावर्ग व्यस्त, भटजींनी लवकर यावे यासाठी धावपळ आजही असते. दिवसभर आरत्यांचा गजर कोठे न कोठे तरी सुरू असतो. हॉलात गणपती स्थापनेचा हेतू एकच असावा, आल्या-गेलेल्यांना, पायवाटेवरून येता-जाताना गणेशदर्शन व्हावे हाच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com