घरगुती हिंसाचाराच्या कटू आठवणींवर मात करण्यासाठी या टिप्स फॉलो करा

कौटुंबिक हिंसाचार हा मुख्यतः महिलांवर होतो. पण कधी कधी पुरुषही त्याला बळी पडतात.
 Stop Domestic Violence
Stop Domestic ViolenceDainik gomantak
Published on
Updated on

How To Tackle Domestic Violence: गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचार (Domestic Violence) हा शब्द प्रचलित होता. याचे कारण म्हणजे जॉनी डेप (Jhonny Depp ) -अंबर हर्ड (Amber Heard) चाचणी. ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. कौटुंबिक हिंसाचाराचे बळी असलेले व्यक्ती अनेकदा कोणाशीही बोलू शकत नाहीत आणि डिप्रेशनमध्ये जातात. (Effects Of Domestic Violence)

घरगुती हिंसा म्हणजे काय?

घरगुती हिंसाचार हा छळाचा प्रकार आहे. हा छळ कोणत्याही प्रकारचा असू शकतो. शारीरिक किंवा मानसिक. शारीरिक शोषणात तुमचा पार्टनर तुमच्या शरीराला इजा करतो. दुसरीकडे, मानसिक अत्याचारामुळे तुमच्या मानसिक स्थितीत समस्या निर्माण होतात. कौटुंबिक हिंसाचाराबद्दल तज्ज्ञांनी सांगितले की, जेव्हा कोणी नातेसंबंधात नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घरगुती हिंसा वाढते. कौटुंबिक हिंसाचार हा मुख्यतः महिलांवर होतो. पण कधी कधी पुरुषही त्याला बळी पडतात. कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी समस्या आहे.

सर्वप्रथम, तुमचे नाते कसे आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

कोणत्याही नात्याचा पाया आदर आणि प्रेम असते. हे जाणून घेण्यासाठी तुमचे नाते कीती परफेक्ट आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण कौटुंबिक हिंसाचाराच्या बहुतांश घटनांमध्ये स्त्रिया जास्त प्रमाणात बळी पडतात.

स्वतःसाठी उभे राहयला शिका

भारतातील ग्रामीण भागात घरगुती हिंसाचार ही एक मोठी समस्या आहे. इथे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव नाही. तुम्ही हिंसाचाराचे बळी असाल तर स्वत:साठी आवाज उठवा. हिंसाचार खपवून घेऊ नका, संघर्ष करा आणि प्रकरण हाताळण्यासाठी पोलिसांची मदत घ्या.

स्वत: वर प्रेम करा

अशा प्रकरणांमध्ये हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला अनेकदा नैराश्यात जातात. बाहेरील जगाशी सलोखा वाढवण्यात ती अंतर ठेवते. या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी महिलांनी स्वतःवर प्रेम केले पाहिजे. तुम्ही जितक्या जास्त लोकांना भेटता आणि त्यांच्याशी बोलता तितके ते तुम्हाला वाईट आठवणी विसरण्यास मदत करेल.

काही तरी उपाय करा

घरगुती हिंसाचाराच्या वाईट आठवणी आणि नैराश्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही थेरपी घेऊ शकता. एखाद्या थेरपिस्टची मदत घेणे आपल्यासाठी चांगले असू शकते. ते तुम्हाला या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतील.

नवीन सुरुवात करा

नैराश्याची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांना भेटणे थांबवता आणि लोकांपासून दूर जाण्यास सुरुवात करता. यामुळे तुमची समस्या तर वाढेलच पण ती कमी होणार नाही. म्हणूनच तुम्ही नव्याने सुरुवात करणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com