Stress Buster Tips: तणाव दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

mental stress
mental stress
Published on
Updated on

अलिकडे अनेक लोक तणावाला बळी पडत आहेत, व्यस्त जीवनशैली यासाठी मुख्य कारण आहे. तणावाची अनेक कारणे असू शकतात, कामाचा ताण, अभ्यासाचा ताण, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, प्रेम किंवा मैत्रीत फसवणूक इ. आपण याबद्दल जितका जास्त विचार करतो तितका ताण वाढत जातो, कारण जास्त विचार करणे हा तणावावर उपाय असू शकत नाही. तणावामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराच्या कार्यावर वाईट परिणाम होतो.

तणाव दूर करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

1. एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका

अनेकवेळा तुम्ही ऑफिसच्या वेळेत किंवा घरातून काम करताना बराच वेळ एकाच जागी बसून राहता, यामुळे तणाव येऊ शकतो. त्यामुळे दर एक तासानंतर काही मिनिटांचा ब्रेक घ्या आणि तरीही काही परिणाम होत नसेल तर पॉवर नॅप म्हणजेच थोड्या वेळासाठी झोप घ्या.

mental stress
Crime News: अत्याचाराचा ठपका ठेवत उपनिरीक्षक पिंगे निलंबित

2. कामाचा अतिताण घेऊ नका

कष्टाला पर्याय ननाही तसेच त्यात काही नुकसान देखील नाही, परंतु प्रत्येकाच्या काही क्षमता असतात. त्यापलिकडे कामाचा दबाव सहन करू शकत नाही. तुम्हाला कामाचा किती भार सहन करावा लागेल याची कल्पना करावी, आणि त्यापलिकडे न जाण्याचा प्रयत्न करावा.

3. लोकांशी बोला, मन मोकळं करा

आपण तणावाला बळी पडतो तेव्हा आपण पूर्णपणे एकांतात जातो, मग स्वतःला खोलीत कोंडून घेणे, मोबाईल बंद करने अशा गोष्टी होतात. पण यामुळे तणाव कमी होण्याऐवजी तो अधिकच वाढतो. त्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांशी बोला, भेटता येत नसेल तर निदान फोनवरून तरी तुमची समस्या सांगा. लोकांशी जेवढं जास्त बोलता येईल तेवढं तुमचं मन हलके होईल. काहीवेळा तुमच्या जवळचे लोक तणाव कमी करण्यात अधिक चांगली मदत करू शकतात.

mental stress
FDA Raid In Goa: ‘मिठाई’च्या दुकानांवर एफडीएची करडी नजर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com