FDA Raid In Goa: ‘मिठाई’च्या दुकानांवर एफडीएची करडी नजर

FDA Raid In Goa: विविध तालुक्यांत छापे व नमुने जमा, एक आस्थापन करण्यात आले बंद
FDA Raid
FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी गणेशोत्सवानिमित्त राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाई व खाद्यपदार्थ बाजारपेठेत आले आहेत. तिसवाडी, बार्देश व केपे तालुक्यातील काही मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापे टाकून नमुने जमा केले आहेत. सुमारे 22 नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील एका आस्थापनामधील अस्वच्छतेमुळे ते बंद करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन खात्याच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या 19 ऑगस्टपासून राज्यातील विविध तालुक्यामध्ये मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानांवर छापे (Raid) टाकून नमुने गोळा करत आहेत. त्यामध्ये काजू कतली, मिल्क केक, मिल्क अंजीर, मोतीचूर लाडू, मलाई पेढा, म्हैसूर पाक, पिक्का पेढा, घी म्हैसूर पाक, बालुशाई, बेसन लाडू, बुंदी लाडू या पदार्थांचा समावेश आहे. विविध तालुक्यातील काही दुकानांमधून जिलेबी, बेसन लाडू व मोतीचूर लाडू यांचे 27 नमुने 22 ऑगस्टला घेण्यात आले आहेत.

FDA Raid
Goa Weather: मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाची घट होणार?

गेल्या 21 ऑगस्टला खात्याच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मडगावातील मिठाई व खाद्यपदार्थ बनविणाऱ्या काही आस्थापनावर सकाळी पहाटेच्या सुमारास छापे टाकले तसेच मडगाव रेल्वे स्थानकावर पहाटे चारच्या सुमारास रेल्वेमधून गणेशचतुर्थीनमित्त येणाऱ्या 'मावा' च्या मालाची तपासणी करण्यात आली मात्र त्यामधून काही संशयास्पद आढळून आले नाही.

तालुक्यामधील मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थ (Food) बनविणाऱ्या 6 जागांची पाहणी करून तपासणी करण्यात आली. स्वच्छता व निचरासंदर्भातचे अहवाल अन्न सुरक्षा (Food Safety Officer) अधिकाऱ्यांनी सादर केले आहेत. या अधिकाऱ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे 11 नमुने जमा केले आहेत त्याचा अहवाल यायचा बाकी आहे.

मोहीम सुरूच राहाणार

खात्यातर्फे मिठाई व खाद्यपदार्थांची तपासणी करून नमुने जमा करणे तसेच छापे टाकण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. काही बाजारपेठामध्ये कृत्रिमपणे फळे पिकवून त्याची विक्री केली जात असल्याने त्याचीही अचानक भेट देऊन तपासणी केली जाईल अशी माहिती खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com