Fruits For Glowing Skin: हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी आजच खाणं सुरू करा 'ही' 5 फळं

चांगल्या आणि चमकदार त्वचेसाठी आहारात काही फळांचे सेवन करणे खुप फायदेशीर असते.
Fruits For Glowing Skin
Fruits For Glowing SkinDainik Gomantak
Published on
Updated on

Fruits For Glowing Skin: हिवाळ्यात केवळ आरोग्यच नाही तर त्वचेशी संबंधित समस्या देखील वाढतात. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी आणि निर्जीव तसेच निस्तेज होते. अशावेळी त्वचेवर महागडे सौंदर्य उत्पादने लावूनही त्याचा फायदा होत नाही. याचे कारण म्हणजे त्वचेतील ओलावा नसणे. अ

हे टाळण्यासाठी तुम्ही आहारात काही फळांचा समावेश केला पाहिजे. ही फळे खाल्ल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझेशनसोबतच चमकदार आणि मुलायम होईल. काहीही न लावताही चेहरा चमकू लागेल. जाणून घेऊया ही फळं कोणती आहेत.

  • किवी

किवीमध्ये अनेक पोषक घटक असतात. तुमच्या आहारात याचा समावेश केल्यास त्वचेसंबंधित समस्या जसे की पिंपल्स, रॅशेस आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. हे कोलेजनचे उत्पादन वाढवते. यातून मिळणारे व्हिटॅमिन ई त्वचा उजळण्यास मदत करते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनवते.

  • संत्रा

संत्र व्हिटॅमिन सी चे उत्तम स्त्रोत मानले जाते. यामुळे केवळ चेहऱ्यावर चमक येत नाही तर संवेदनशील त्वचेला एक्सफोलिएट देखील करते. हिवाळ्यात हे एक अतिशय गुणकारी फळ आहे. तसेच संत्र खाल्ल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात.

  • डाळिंब

हिवाळ्यात डाळिंब काणे आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर असते. चेहऱ्यावर चमक आणायची असेल तर नियमितपणे डाळिंबाचे सेवन करावे. चेहऱ्यावरील सुरकुत्या, डेड स्किन कमी होण्यास मदत मिळते.

  • अननस

हिवाळ्यात अननस मुबलक प्रमाणात मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच ब्रोमेलेन चांगल्या प्रमाणात आढळते. आहारात याचा समावेश केल्यास त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय त्वचेची चमकही वाढते. हे शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करते.

  • पपई

पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच त्वचा देखील चांगली राहते. पपई पेपिन कोलेजनचे उत्पाहन वाढवण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि ई वाढवते. यामुळे चेहरा अधिक चमकदार दिसतो. तसेच त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com