Energy Boosting Foods: अशक्तपणा जाणवतोय? तर मग शरीराला झटपट एनर्जी देण्यासाठी खा हे पदार्थ

Energy Boosting Foods: शरीर सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऊर्जा आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे दिवसभर आळशी आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत शरीराला ऊर्जा देण्यासाठी आहार अत्यंत आवश्यक आहे.
Energy Boosting Foods
Energy Boosting FoodsDainik Gomantak
Published on
Updated on

Energy Boosting Foods: आजकालच्या व्यस्त जीवनात शरीर इतके थकले आहे की लोकांना अनेकदा अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितीत शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी ऊर्जेची सर्वाधिक गरज असते. तथापि, कधीकधी झोपेची कमतरता देखील थकवा आणू शकते.

Energy Boosting Foods
World Mental Health Day 2023: वर्किंग आणि प्रोफेशनल्स जीवनात समतोल असणे गरजेचेच

शरीरात उर्जेची कमतरता असेल तर व्यक्तीला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, जे खाल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल. चला तर मग जाणून घेऊया, शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.

अंडी

प्रथिनेयुक्त अंडी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यात अमीनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. तुम्ही ते रोज नाश्ता म्हणून खाऊ शकता. अंड्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी12, सेलेनियम आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरातील ऊर्जा पातळी राखतात.

Energy Boosting Foods
Dark Chocolate Benefits: हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर

पॉपकॉर्न

पॉपकॉर्न संपूर्ण धान्यापासून तयार केले जाते. यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. इतर कुरकुरीत स्नॅक्सच्या तुलनेत त्यात कमी कॅलरी असतात. हे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते.

सफरचंद

सफरचंद फायबरचा समृद्ध स्रोत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रोज सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार शरीरापासून दूर राहतात. याशिवाय अँटिऑक्सिडंट्स, फायबर, क्वेर्सेटिन, कॅटेचिन, फ्लोरिडझिन आणि क्लोरोजेनिक अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक सफरचंदात आढळतात. शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com