स्वादिष्ट अन् पौष्टिक दुधी भोपळा-चणाडाळीची भाजी उन्हाळ्यात जरूर खावी

चणाडाळमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात,
 gourd and gram dal vegetable
gourd and gram dal vegetable Dainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्यात (Summer) प्रत्येक घरात चणाडाळ बनवली जाते आणि ती बहुतेक लोकांना आवडते. शेतातील नविन निघालेल्या हरभऱ्यापासून चणाडाळ तयार केली जाते. ही चणाडाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्वादिष्ट तसेच पौष्टिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात याचा समावेश करावा. (Delicious and nutritious gourd and gram dal vegetable must be eaten in summer)

 gourd and gram dal vegetable
मार्केटमध्ये येणार रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाइक, वैशिष्ट्ये घ्या जाणून

चणाडाळ आणि दुधी भोपळ्यात कोणते पोषक तत्वे आहेत?

चणाडाळमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात, याशिवाय हरभरा डाळीमध्ये काही प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. दुधी भोपळ्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. याशिवाय दुधीभोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, झिंक आणि पोटॅशियम देखील असते. यामुळे पचनसंस्थेचे आजार होत नाही.

प्रथिने- चणाडाळ आणि दुधी भोपळामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. प्रथिने मिळवण्यासाठी तूरडाळ आणि चणा डाळीची भाजी करून खाऊ शकतो. यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतील. प्रथिनांची कमतरताही पूर्ण होईल.

वजन कमी होते- जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात दुधी भोपळा आणि चणा डाळ खाऊ शकता. जर तुम्हाला चणा सुकी डाळ खाता येत नसेल तर, त्याची भाजी करून खा. चणा डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही आणि तुम्ही जास्त खाणे टाळता येते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते- हरभरा डाळ खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

 gourd and gram dal vegetable
नवरात्रीच्या उपवासात आपण सैंधव मिठाचे सेवन का करतो, जाणून घ्या त्याचे फायदे

पचनशक्ती सुधारते- जर तुमची पचनक्रिया कमजोर असेल तर तुम्ही दुधी भोपळा आणि चणाडाळीची भाजी नक्कीच खावी. दुधी भोपळ्याची भाजी आणि चणा डाळीने पचनशक्ती मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता, उलट्या, जुलाब या समस्या दूर होतात. चणाडाळ आणि दुधी भोपळ्याची भाजी खाल्याने गॅसची समस्या दूर करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com