Facebook Login: फेसबूक युजर्सचे लॉगिन डिटेल्स चोरणारी 400 अँड्राईड आणि आयओएस अॅप्स मेटा कंपनीने ओळखली आहेत. फेसबूक अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून कंपनीने पासवर्ड बदलण्याचा सल्लाही नुकताच दिला होता.
फेक अॅप्स युजरच्या आयडी, पासवर्डसाठी नकली फेसबूक लॉगिनचे संकेत देतात. त्यामुळे मेटाने युजर्सना केवळ अधिकृत अॅपच डाऊनलोड करण्यास सांगितले आहे.
कंपनीने युजर्सना सतर्क करण्यासाठी या सर्व अॅप्सची लिस्ट जारी केली आहे. यातील बहुतेक अॅप्स ही फोटो एडिटिंग टुल किंवा व्हीपीएन सर्व्हिस सेवा देण्याचा दावा करणारी अॅप्स आहेत. काही अॅप्स गेम्सदेखील युजरला त्याची पर्सनल माहिती विचारतात. यातील अनेक अॅप्स थर्ड पार्टी स्टोअर्सची असतात. जर ऑनलाईन माहितीची चोरी झाली तर हॅकरला युजरच्या अकाऊंटद्वारे त्याचे कुटूंब, मित्र, सहकारी आणि प्रायव्हेट मेसेजपर्यंत पोहचू शकतात.
युजरची फसवणूक करण्यासाठी ही अॅप्स बनवणारे लोक नकली रिव्ह्यु प्रसिद्ध करतात. तसेच ज्यांनी या अॅप्सचा अनुभव घेतला आहे, त्यांचे निगेटिव्ह रिव्ह्युही लपवतात.
एफबी अॅडव्हर्टायझिंग ऑप्टीमायझेशन, बिझनस अॅडस् मॅनेजर,अॅड् अॅनालिटिक्स, एफबी अॅडव्हर्ट ऑप्टिमायेझनश, एफबी अॅडव्हर्ट कम्युनिटी, मेटा ऑप्टीमायझर, बिझनेस मॅनेजर पेजेस, मेटा अॅडव्हर्ट मॅनेजर, अॅड ऑप्टिमायझेशन मेटा, एफबी पेजेस मॅनेजर, अॅडस् अँड बिझनेस सुट इत्यादी अशी ही 400 अॅप्स आहेत. मेटाने ही अॅप्स कोणती आहेत ते कळण्यासाठी एक लिंकही दिली आहे. मेटाच्या मते, युजर्सनी अॅप अधिकृतच डाऊनलोड करावे, अॅप डाऊनलोड करण्यापुर्वी पब्लिशरची ओळख तपासली पाहिजे. जर तुमच्या फेसबूक आयडीशी छेडछाड झाली असेल तर पासवर्ड बदलावा. टु फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील अॅक्टिव्हेट करावे, असे मेटाना म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.