Cleaning Tips: कारच्या सीटवरील डाग काढा एका झटक्यात,फक्त वापरा ही ट्रिक

कारमध्ये प्रवास करताना सीट खराब होणे साहजिक आहे. पण डागांमुळे खराब झालेली सीट कशी स्वच्छ करावी हे जाणून घेऊया.
Cleaning Tips
Cleaning TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Cleaning Tips: आजकाल करा सर्वांकडेच आहे. कारमुळे फार कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होते. तसेच रस्त्यावर सोक कमी आणि कार जास्त दिसतात. कार स्वच्छ आणि नव्यासारखी ठेवणे हे खूप कठीण काम आहे. खास करून जेव्हा प्रयत्न करूनही कारच्या सीटवरचे डाग निघत नाही. चला तर मग जाणून घेऊया कार सीटवर पडलेले डाग सोप्या पद्धतीने कसे काढावे.

  • 'हे' काम आधी करावे

कारच्या सीटवरील कोणताही डाग काढून टाकण्यापूर्वी पहिले व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करावे. व्हॅक्यूमच्या मदतीने कारमधील सर्व घाण निघुण जाते.

  • कसे काढाल डाग

क्लब सोडाला कार्बोनेटेड वॉटर देखील म्हणतात. हे केवळ कॉकटेल मिसळण्यासाठीच नव्हे तर साफसफाईसाठी देखील वापरले जाते. पोटॅशियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम सायट्रेट क्लब सोडामध्ये आढळतात. ही दोन प्रकारची खनिजे आहेत. जर तुमच्या फॅब्रिक कारच्या सीटवर डाग पडला असेल तर तुम्ही क्लब सोडा वापरून या डाग काढू शकता.

  • कसा करावा वापर

क्लब सोडा स्प्रे बाटलीमध्ये भरावे.

आता सीटवर क्लब सोडा स्प्रे करावा.

कारच्या सीटवरील डाग ब्रशच्या मदतीने घासून घ्यावे.

स्वच्छ ओल्या कापडाने सीट पुसून टाकावे.

शेवटी ब्लो ड्रायरच्या मदतीने कार सीट कोरडी करावी.

  • पदार्थांचे डाग कसे काढावे

अनेक लोकांना गाडीत बसून काहीतरी खाण्याची सवय असते. कारच्या सीटवर काही पदार्थ पडल्यास त्याचा डाग पडतो. तो काढून टाकण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही घरी असलेल्या गोष्टींपासून डाग स्वच्छ करू शकता.

  • कसा करावा वापर

कोमट पाण्यात थोडे डिटर्जंट घाला.

आता दोन्ही गोष्टी नीट मिक्स कराव्या.

ही पेस्ट सीटवर लावावे.

सुमारे 10 ते 15 मिनिटांनंतर, स्वच्छ कपड्याने डाग स्वच्छ करावे.

डाग निघून गेल्यावर दुसरे कापड थंड पाण्यात भिजवावे आणि सीट स्वच्छ करावी.

  • शाईचे डाग कसे काढायचे?

कार सीट फॅब्रिक्स देखील वेगवेगळे असतात. त्यामुळे सीट स्वच्छ करताना फॅब्रिककडे लक्ष दिले पाहिजे. जर तुमच्या मुलाने लेदर कार सीटवर शाईचा डाग पाडला असेल तर काळजी करू नका. चामड्याच्या वस्तू पाण्याने स्वच्छ करता येत नाहीत. नेल पेंट रिमूव्हर अल्कोहोलच्या मदतीने बनवले जाते. शाईचे डाग काढण्यासाठी नेल पेंट रिमूव्हर वापरू शकता.

  • कसा करावा वापर

डाग असलेल्या भागात नेल पेंट रिमूव्हरचे काही थेंब टाकावे.

5 मिनिटांनंतर टिश्यू पेपरच्या मदतीने शाईची डाग असलेली जागा स्वच्छ पुसून टाकावी.

नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने तुम्ही शाईचा सहज डाग काढू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com