Cinnamon Health Benefits: दालचिनी म्हणजे अनेक रोगांवर औषध; शरीराला मिळतात 'हे' फायदे

विविध प्रकारचे औषधी वनस्पती आणि मसाले आहेत, जे बऱ्याच बाबतीत आरोग्यास फायदेशीर ठरू शकतात.
Cinnamon Health Benefits
Cinnamon Health BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Cinnamon Health Benefits: भारतीय स्वयंपाकघरात एकाहून एक आरोग्यदायी गोष्टी असतात. विविध प्रकारचे औषधी वनस्पती आणि मसाले आहेत, जे बऱ्याच बाबतीत आरोग्यास फायदेशीर ठरू शकतात. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या बहुतेक मसाल्यांमध्ये काही ना काही गुण नक्कीच दडलेला असतो.

अनेकांमध्ये दालचिनीसारख्या आवश्यक पोषक तत्वांचाही समावेश असतो. दालचिनी बहुतेक घरांमध्ये वापरली जाते. पण त्याचे फायदे कधी लक्षात घेतले आहेत का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला या मसाल्याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही त्याचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकाल.

Cinnamon Health Benefits
Periods Delay Tablet: पीरियड्स पुढे ढकलण्यासाठी तुम्हीही गोळ्या घेता? मग हे एकदा वाचाच

दालचिनीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप मदत होते. एका अभ्यासात असे म्हटले आहे की दालचिनी मेंदूचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.

न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत जे स्मृती आणि शिकण्यासारख्या संज्ञानात्मक प्रक्रियांना चालना देण्यास मदत करतात.

दालचिनी खाण्याचे फायदे

जगभरात केलेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की दालचिनीचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. एका नवीन अभ्यासात असेही आढळून आले आहे की या मसाल्यामध्ये असलेले काही पोषक घटक आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

दालचिनीमध्ये असलेले घटक, जसे की सिनामिक ऍसिड, युजेनॉल आणि सिनामल्डिहाइड, यांचा मेंदूच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. बिरजंद युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

दालचिनीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही त्याचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता. तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश करण्यासाठी तुम्ही या प्रभावी पद्धती वापरू शकता.

1. दालचिनीचे पाणी:

तुम्ही दालचिनीचे डिटॉक्स वॉटर बनवून सकाळी त्याचे सेवन करू शकता. तुम्हाला फक्त एक ग्लास पाण्यात अर्धा इंच दालचिनीची काडी रात्रभर भिजवून ठेवावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्यावे.

2. दालचिनीचा चहा:

ज्या लोकांना सकाळी गरम काहीतरी पिण्याची सवय आहे, ते दालचिनीचा चहा पिणे सुरू करू शकतात. तुम्हाला फक्त पाणी उकळताना अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकायची आहे. ते मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळावे आणि नंतर गाळून प्यावे.

3. मसाला म्हणून वापरा:

तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये इतर पदार्थांमध्येही दालचिनीचा वापर करू शकता. यामुळे आरोग्याला नक्कीच फायदा होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com