Chewing Gum Side Effects: च्युइंगमप्रेमींनो सावधान! तुमची छोटीशी चुक ठरु शकते जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Chewing Gum Health Risks: अनेकजण च्युइंगम आवडीने खातात. काही लोकांसाठी ते माउथ फ्रेशनर आहे तर काहींसाठी ते स्वीटनर आहे, पण जर तुम्हालाही च्युइंगम खाण्याची सवय असेल तर सावधान. होय, च्युइंगम खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
Chewing Gum Health Risks
Chewing Gum Side EffectsDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकजण च्युइंगम आवडीने खातात. काही लोकांसाठी ते माउथ फ्रेशनर आहे तर काहींसाठी ते स्वीटनर आहे, पण जर तुम्हालाही च्युइंगम खाण्याची सवय असेल तर सावधान. होय, च्युइंगम खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. च्युइंगम चघळताना अजाणतेपणे हजारो प्लास्टिकचे कण तुमच्या पोटात जाऊ शकतात. तुम्हा आम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की च्युइंगम आणि प्लास्टिकमध्ये काय फरक आहे?

च्युइंगम काय आहे?

च्युइंगमचा मुख्य आधार गम बेस आहे. पूर्वीच्या काळात, गम बेस नैसर्गिक पदार्थांपासून बनवला जात होता. पण आजकाल च्युइंगम्सचा गम बेस कृत्रिम पॉलिमरपासून बनला जातो, जो प्लास्टिकसारखाच असतो.

Chewing Gum Health Risks
Ovarian Cancer: महिलांनो, गर्भाशयाचा कर्करोग होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच सावध व्हा

गम बेसमध्ये सहसा काय असते?

पॉलीव्हिनिल अ‍ॅसीटेट

पॉलीथिलीन

रबर किंवा रेझिन

प्लास्टिसायझर्स

नवीन अभ्यास आणि संशोधन

हे सर्व कृत्रिम पदार्थ आहेत, जे प्लास्टिक बनवण्यासाठी देखील वापरले जातात. ताज्या संशोधन आणि अभ्यासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. पहिली गोष्ट - कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉस एंजेलिसच्या अभ्यासानुसार, एका ग्रॅम च्युइंगममधून सरासरी 100 मायक्रोप्लास्टिकचे तुकडे बाहेर टाकू शकतात, तर काही गम 600 पेक्षा जास्त तुकडे बाहेर टाकू शकतात. दुसरी गोष्ट- च्युइंगमचा एक सामान्य तुकडा सुमारे 1.5 ग्रॅम वजनाचा असतो, याचा अर्थ असा की, जो व्यक्ती दररोज च्युइंगम चघळतो तो दरवर्षी सुमारे 30,000 मायक्रोप्लास्टिकच्या कणांचे सेवन करतो.

Chewing Gum Health Risks
Stomach Cancer: वेळीच ओळखा पोटाच्या कर्करोगाची 'ही' 3 लक्षणे, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

तिसरी गोष्ट: च्युइंगममध्ये वापरले जाणारे पॉलिमर, जे गमला चवदार बनवतात, ते बहुतेकदा पेट्रोलियमपासून बनवलेले कृत्रिम प्लास्टिक असते, जरी काही गममध्ये झाडाच्या रसापासून बनवलेले नैसर्गिक पॉलिमर देखील असते. दोन्ही प्रकारच्या गममध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहे. चौथी गोष्ट: हे मायक्रोप्लास्टिक कण इतके लहान असतात की ते लाळेसह शरीरात जातात. यातील काही कण नॅनोप्लास्टिक्सच्या स्वरुपात देखील आहेत, जे आणखी लहान आहेत, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com