‘पीसीओडी’ची कारणे आणि त्यावरील उपाय तुम्हाला माहितीयेत का?

बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेक महिलांमध्ये पीसीओडी (PCOD) आजार दिसून येतो. त्याची कारणे, आणि त्यावरील उपाय प्रत्येकीला माहित असणे गरजेचे आहे.
PCOD
PCODDainik Gomantak

PCOD : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्या राहणीमानात देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्यात तर अनेक बदल झाले आहेत. दगदगीच्या आयुष्यात महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात सगळ्यात महत्वाचा विषय येतो तो महिलांच्या मासिक पाळीचा (Menstruation). आज देशातील सरासरी १० पैकी ८ महिला मासिक पाळी किंवा ‘पीसीओडी’ने (PCOD) त्रस्त आहेत. त्यामुळे पीसीओडीची कारणे, आणि त्यावरील उपाय प्रत्येकीला माहित असणे गरजेचे आहे.

PCOD
गोवा भाजपमध्ये 'मास भारती' होणार; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

पीसीओडीची (PCOD) कारणे :

पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease). यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या मासिक पाळीत अनियमितता आढळून येते. तसेच अंडाशयात गाठी तयार होतात.

1. चुकीचे राहणीमान (Poor Lifestyle) :

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यात अनेक बदल घडून आलेत. याचाच परिणाम म्हणून महिलांच्या मासिक पाळीत अनियमितता दिसून येते किंवा मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना होतात.

PCOD
भंडारी समाजाला आरक्षण देण्यात भाजप अपयशी: गोवा फॉरवर्ड

2. समतोल आहाराची कमतरता (Poor Diet) :

फास्ट लाईफमध्ये हल्ली फास्टफूड (Fast Food) चे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याने महिलांच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषकतत्वांची कमतरता भासते. ज्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल असमतोल वाढू लागतो. परिणामी महिलांना पीसीओडी सारख्या आजाराला बळी पडावे लागते.

3. व्यायामाचा अभाव (Lack of exercise) :

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाला खूप महत्व आहे. पण बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी किंवा व्यायामाचा अभाव आजकालच्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे सुद्धा नकळत पीसीओडीला आमंत्रण दिले जाते.

पीसीओडीवरील उपाय (Remedies for PCOD) :

1. संतुलित आहार (Balanced Diet) :

पीसीओडीपासून सुटका करण्यासाठी सर्वात महत्वाचे काय असेल तर तो म्हणजे नियमित संतुलित आहार. संतुलित आहारामुळे पीसीओडी बरा होण्यात खूप मदत होते. त्यामुळे जर तुम्ही पीसीओडीमुळे त्रस्त असाल तर आपल्या राहणीमानाबरोबरच आपल्या आहारात देखील जाणीवपूर्वक बदल करा. फळे, पालेभाज्या, दूध, अंडी अश्या आवश्यक घटकांचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर बाहेरचे खाणे टाळा.

2. नियमित व्यायाम (Exercise Regularly) :

संतुलित आहाराला जर नियमित व्यायामाची साथ मिळाली तर पीसीओडी बरा होण्यास आणि तुमचे आरोग्य सुधारण्याचा वेगदेखील वाढतो. यामुळे आपल्या शरीरात जमा होणारे विषारी घटक (Toxic Components) दूर होतात.

3. अति ताण घेणे टाळा (Avoid Excessive Stress) :

कामाचा/ करिअरचा ताण, आरोग्याचा ताण, भविष्याचा ताण या सगळ्या ताणामुळे आरोग्यावरील ताण आपोआप वाढतो. तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ताण घेणे हे पीसीओडी होण्याच्या कारणांधील एक मुख्य कारण आहे. जेवढा ताण जास्त; तेवढंच आपल्या मासिक पाळीतील अनियमितता वाढत जाते. त्यामुळे ताण न घेण्याचा सल्ला महिलांना दिला जातो.

PCOD
सांगेत 'त्यांच्या' कॉंग्रेस पक्षप्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज

पीसीओडीचा आपल्या गर्भधारणेवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण चांगल्या स्त्री- रोगतज्ञांकडे उपचार घेणेही तितकेच गरजेचे आहे. आपले आरोग्य संपूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव आपल्याला असणे अत्यंत गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com