Brahma Kamal For Happiness: हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला खास महत्त्व आहे. सर्व देवी-देवतांना कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. कमळाच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्यापैकी सर्वात चमत्कारिक म्हणजे ब्रह्म कमल आहे. ब्रह्मकमळ वर्षातून एकदाच उमलतात आणि फक्त चार ते पाच तास फ्रेश राहते. असे मानले जाते की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो, त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी वास करते.
ज्योतिष शास्त्रामध्ये ब्रह्मकमळाचे महत्व सांगणारे काही उपाय सांगितलेले आहे. या उपायांचे पालन केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते.
देवांची कृपा कायम राहते
ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. जेव्हा हे फुल उमलते तेव्हा यावर भगवान विष्णूची प्रिमा दिसते. असे मानले जाते की भगवान शिवाने ब्रम्हकमळाचे पाणी शिंपडून गणेशाला पुन्हा जिवंत केले, म्हणून ते जीवन देणारे फुल देखील मानले जाते.
महादेवाला प्रिय
ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला ब्रम्हकमळ अर्पण केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. तसेच महादेवाला पांढरे फुलं प्रिय आहे. ज्या लोकांनी हे फुलं उमलताना पाहिले आहे त्यांचे नशीब बदलले आहे.
घरात सुख-समृद्धी लाभते
घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख-समृद्धी लाभते. या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही. असे मानले जाते की या फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते.
अनेक आजार होतात दूर
ब्रम्हकमळामध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म आढळतात. कर्करोग,सर्दी, खोकला आणि थकवा कमी करण्यासाठी हे फुल फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील रक्त शुद्ध करते आणि हृदयासंबंधित आजार दूर ठवते. तसेच ब्रम्हकमळामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात जे जखम भरण्यास मदत करते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.