एका रात्रीत पिंपल्सचा त्रास होईल कमी; जाणून घ्या सुपारी पानाचे फायदे

सुपारीचे पान अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मुरुमांची समस्या असो किंवा हट्टी डाग, या सर्वांवर उपचार करण्यासाठी तुम्ही या पानांचा वापर करू शकता.
Betel Leaf
Betel Leaf Dainik Gomantak
Published on
Updated on

जेवण झाल्यानंतर पान खाणे बऱ्याच लोकांना आवडतं. अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या पानाचे शौकीन असतात, त्यामुळे तोंडाची चव वाढते. घसा साफ होतो. पण त्वचेसाठी पान किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण अशाच एका पानाबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे सुपारीचे पान. या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Benefits of Betal leaf)

आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक मुलींच्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे पान. जर तुम्ही अजून तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा समावेश केला नसेल तर नक्कीच करा. या पानामधील औषधी गुणधर्म तुमच्या त्वचेची चमक वाढवू शकतात तसेच चेहऱ्यावरील डाग दूर करू शकते.

आजकाल अनेकांना त्वचेच्या समस्या आहेत. शारीरिक समस्या, कामाचा भार, ताणतणाव, व्यस्त जीवनशैली, अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे आपण आपल्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे अनेक समस्या फेस करत असतो. या समस्या तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक हिरावून घेतात. शारिरीक समस्या बऱ्या झाल्या तरी चेहऱ्यावरचा ग्लो यायाला वेळ लागतो. अशा वेळी तुम्हाला अशा काही गोष्टी वापरण्याची गरज आहे, ज्याचा तुम्हाला लवकर फायदा होईल.

Betel Leaf
दम्यावर करा घरगुती उपचार; त्रास होईल कमी

चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होईल
सुपारीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे चेऱ्यावरील मुरुम दूर करण्यासाठी प्रभावी मानले जातात. यासाठी तुम्ही काही सुपारीची पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. त्यात 2 चिमूटभर हळद आणि कोरफडीचे जेल मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. ही पेस्ट रात्री पुन्हा एकदा पिंपल्सच्या ठिकाणी लावा. 20 मिनिटांनी चेहरा धुवा. पिंपल्स कमी होऊ लागतील.

सुपारीच्या पानांचा फेस पॅक
सुपारीच्या पानांचा फेस पॅक अनेक प्रकारे वापरला जातो. चेहऱ्याचा रंग वाढवण्यासाठी वरील प्रकारे तयार केलेल्या पेस्टमध्ये 1 चमचा तांदळाचे पीठ मिक्स करा. ते चेहऱ्यावर लावा आणि थोडे कोरडे होऊ द्या. कोरडे होताच आपले हात ओले करा आणि गोलाकार हालचालींनी चेहऱ्यावर पाच मिनिट मालिश करा. फेसपॅक लावल्यानंतर 15 मिनिटांनी ही प्रक्रिया करणे गरजेचं आहे. 4 ते 5 मिनिटे स्क्रब केल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 4 ते 5 दिवसात तुम्हाला स्वतःहून फरक दिसू लागेल.

सुपारीचे पानाचे पाणी कसे वापरावे
सकाळ आणि सायंकाळच्या स्किन केअर रूटीन सुरू करण्यापूर्वी तुमचा चेहरा सुपारीच्या पाण्याने धुवा. यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे लागेल. आता त्यात 5 ते 6 सुपारीची पाने टाका आणि पाणी हिरवे होईपर्यंत ते उकळा. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. हे पाणी कोमट झाल्यावर या पाण्याने चेहरा धुवा. धुतल्यानंतर, टॉवेलने टॅप करून स्वच्छ करा. आपल्याला फरक जाणवल्याच आपण रोज असे करू शकता.

Betel Leaf
Propose Day 2022: प्रेम व्यक्त करायचय, मग वापरा या भन्नाट कल्पना

चेहऱ्यावर खाज येणे
खाज येण्याची समस्या कोणत्याही ऋतूत सुरू होऊ शकते. अशा वेळी आंघोळीसाठी गरम पाण्यात सुपारीची पाने टाका. कोमट झाल्यावर थोडा वेळ थांबा, नंतर त्यातील सुपारीची पाने काढून टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. फक्त हात आणि पायाला खाज येत असेल तर पाणी वेगळे गरम करून त्यात 6 ते 7 सुपारीची पाने मिसळा. चांगले उकळले की पाने काढून घ्या आणि आता हे पाणी आपल्या पायावर खाज असेल त्या ठिकाणी सावकाश सोडा.

डाग घालवण्यासाठी सुपारीच्या पानाचा वापर
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी सुपारीच्या पानाचा वापर करता येतो. मात्र तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर या पानांचा वापर करू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सुपारीची पाने वाळवून त्याची पावडर बनवू शकता. ते पावडरच्या स्वरूपात दीर्घकाळ साठवले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार वापरले जाऊ शकते. डाग घालवण्यासाठी एक चमचा पावडर घेऊन त्यात गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट बनवा. आणि ती चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com