Milk In Diabetes: मधुमेह असणाऱ्यांनी 'या' 3 गोष्टी दुधात मिक्स करुन प्या

मधुमेहाच्या रुग्णाने दूध प्यावे की नाही?
Milk In Diabetes
Milk In DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. आहाराने रक्तातील साखरेवर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारासोबतच वेळेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

मधुमेहाच्या रुग्णाची रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती देखील हळूहळू कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे शरीरात इतर अनेक रोग देखील उद्भवतात. हा प्रश्न मधुमेही रुग्णाच्या मनात नक्कीच येतो की त्यांनी दूध प्यावे की नाही? तुम्ही कधीही दूध प्यायल्यास ते तुम्हाला अडचणीत आणू शकते. जाणून घ्या मधुमेहामध्ये दूध कोणत्या वेळी आणि कसे प्यावे. 

  • मधुमेहामध्ये दूध कसे प्यावे

  • बदामाचे दूध

बदामाचे दूध मधुमेहामध्ये (Diabetes) फायदेशीर आहे. बदामामध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. बदामाच्या दुधातही कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. 

Milk In Diabetes
Vastu Tips For Plant: केवळ तुळसच नाही, तर ही वनस्पती करते मालामाल
  • दालचिनीचे दूध

मधुमेहाचे रुग्णही दालचिनीचे दूध पिऊ शकतात. मसाला म्हणून वापरण्यात येणारी दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी तत्व आढळतात, जे साखरेची पातळी योग्य ठेवतात. त्यामुळे मधुमेही रुग्णाने दालचिनीचे दूध प्यावे. 

  • हळदीचे दूध

हळदीचे दूध (Milk) मधुमेहाच्या रुग्णाला फायदेशीर ठरते. हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे नैसर्गिक पद्धतीने मधुमेहावर फायदेशीर असतात. हळदीचे दूध प्यायल्याने इन्सुलिनची पातळी चांगली राहते. म्हणूनच हे दूध खूप फायदेशीर आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com