Winter Skin Care: थंडित त्वचा कोरडी होतीयं? घरीच बनवा फेस पॅक

कोरड्या त्वचेची काळजी न घेतल्यास निस्तेज होऊ शकते.
Winter Skin Care
Winter Skin CareDainik Gomantak
Published on
Updated on

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचेच्या समस्यांपासून मुक्तता तर होतेच शिवाय तुमची त्वचा चमकदारही होते. विशेषतः हिवाळ्याच्या सुरुवातीला त्वचा खूप कोरडी होते. यामुळे त्वचेच्या (Skin) कोरडेपणावर उपचार केले नाहीत तर त्यामुळे त्वचा निस्तेज तर होतेच पण त्वचेच्या अनेक समस्याही सुरू होतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केवळ तेलकट त्वचेवरच (Oily Skin) नाही तर कोरड्या त्वचेवरही मुरुम येण्याची शक्यता खूप जास्त असते. चला तर मग जाणून घेउया फेस पॅक बेस्ट आहेत.

  • नारळाचा फेसपॅक

    नारळाचा फेसपॅक बनवण्यासाठी प्रथम दोन चमचे नारळाच्या तेलात (Coconut Oil) एक चमचा मध मिसळा. 20-30 मिनिटे चेहरा, मान आणि हात आणि पायांवर बसू द्या. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल. 

  • केळीचा फेस 
    पॅक (Face Pack) बनवण्यासाठी एक पिकलेले केळे घ्या आणि त्यात दोन चमचे मध घाला.त्याची पेस्ट बनवा.आता हे चेहऱ्याव्यतिरिक्त कोरड्या जागेवर लावा. 20-25 मिनिटे त्वचेवर राहू द्या आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

Face Pack
Face PackDainik Gomantak
Winter Skin Care
DIY Hair Mask: मुलायम केसांसाठी ट्राय करा 'हे' घरगुती कॉफी हेअर पॅक
  • मेयोनीज फेस पॅक
    मिओनी  फक्त खाण्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यासाठी नॉन-फ्लेव्हर व्हेज मेयोनेझमध्ये दोन चमचे बेबी ऑइल टाका.आता ते तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि हातावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ धुवावा.

  • चॉकलेट आणि मध 
    एका कपमध्ये 2-4 गडद चॉकलेट वितळवा. त्यात 1 चमचा मध घालून गुळगुळीत पेस्ट बनवा.15-20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. नंतर साध्या पाण्याने धुवा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com