Ayurveda Tips: तुमची वेट लॉस जर्नी सोपी करु शकतात 'हे' आयुर्वेदिक उपाय

तुम्हालाही जर झटपट वजन कमी करायचे असेल तर या पद्धतींचा वापर करावा.
Ayurveda Tips for weight loss
Ayurveda Tips for weight lossDainik Gomantak

Ayurveda Tips: आजच्या काळात धावपळ आणि अयोग्य आहार यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. यातून सुटका मिळवण्यासाठी ते कधी डायटिंग तर कधी तासनतास जिममध्ये घाम गाळत असतात.

एवढे करुनही वजन कमी होत नाही. जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर तुम्ही इतर अनेक गंभीर आजारांना बळी पडू लागतो.

स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती ट्राय करून थकला असाल तर तुमच्या डाएट आणि वर्कआऊट व्यतिरिक्त हे 5 आयुर्वेदिक उपाय ट्राय करा. याचा तुम्हाला नक्की फायदा होइल.

  • वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणते

  • दालचिनी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनीला आपल्या आहारात समावेश करु शकता. आपल्या शरीराची पचन संस्था सुरळित करुन वजन कमी करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी तुम्ही त्याचा चहा किंवा आहारात समावेश करू शकता. दालचिनीचे पाणी शरीरातील चरबीच्या पेशी नष्ट करण्यास मदत करते. दालचिनीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते.

  • आलं

आल्याचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर वजन कमी करण्यासाठीही केला जातो. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म फ्री रॅडिकल्सशी लढून शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. आल्याचे पाणी नियमित घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Ginger
Ginger Dainik Gomantak
Ayurveda Tips for weight loss
Skin Care: आलिया भट्टसारखी ग्लोइग स्किन हवी असेल तर फळाने करा मसाज
Ayurveda Tips for weight loss
Skin Care: आलिया भट्टसारखी ग्लोइग स्किन हवी असेल तर फळाने करा मसाज
  • हळद

हळदीचा वापर प्रत्येक घरात केला जातो. हळद औषधी गुणधर्मांसाठी अधिक प्रसिध्द आहे. हळदीचा मुख्य घटक कर्क्युमिन फॅट टिश्यूच्या वाढीस प्रतिबंध करतो. याव्यतिरिक्त हळदीच्या चहाचे नियमित सेवन केल्याने आपल्या पाचन तंत्रावर आणि चयापचयवर सकारात्मक परिणाम होतो.

  • गिलॉय

गिलॉयचा उपयोग केवळ प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठीच नाही तर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील केला जातो. गिलॉय शिलाजीत किंवा कोरफड सोबत घेतल्यास ते पचनसंस्था सुधारते आणि वजन कमी (Weight Loss) करण्यास देखील मदत करते.

  • मेथी

वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर मानले जातात. तुमची पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीरातील चयापचय क्रियाही मजबूत करते. वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे ग्लासभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com