Beauty Tips: लग्नात बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे सुंदर दिसायचे असेल तर करा 'हे' 5 काम

लग्नात फक्त महागडा लेहेंगा, दागिने आणि मेकअप करून सुंदर दिसू शकत नाही.
Beauty Tips
Beauty TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Beauty Tips: प्रत्येक मुलीला लग्नात सुंदर आणि वेगळे दिसावे असे वाटते. लग्नात फक्त महागडा लेहेंगा, दागिने आणि मेकअप करून सुंदर दिसू शकत नाही. अशावेळी नैसर्गिक सौंदर्यावर भर देणे गरजेचे असते. सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लग्नाच्या काही दिवस आधी पुढील गोष्टी केल्यातर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

या गोष्टींचा आहारात समावेश करा

चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी तुमच्या आहारात भरपूर फळं आणि भाज्यांचा समावेश करावा. दिवसभरात थोडं थोडं खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामुळे तणाव दूर होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.

फळं आणि भाज्यांचा रस

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी दररोज किमान दोन ग्लास भाज्यांचा रस प्यावा. टोमॅटो, पालक आणि पुदिन्याचा रस शरीरासाठी डिटॉक्सचे काम करतो आणि नैसर्गिक चमक देतो.

प्रथिने आणि कॅल्शियमचे सेवन

तुमच्या आहारात प्रथिने आणि कॅल्शियम समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. आहारतज्ञांच्या मते दररोज किमान 40 ते 45 ग्रॅम प्रोटीन घेतले पाहिजे.

संत्र्याचा रस प्या

जर तुम्ही ताज्या संत्र्याचा रस प्यायला तर तुमच्या त्वचेला आणि केसांना योग्य पोषण मिळेल. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. जे शरीराला इतर पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते. यामध्ये असलेले पोषण सौंदर्य वाढवण्याचे काम करते.

रिफाइंड ऑइल

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि सौंदर्य हवे असेल तर तुम्ही रिफाइंड आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावे. जर तुम्हाला मुरुमांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नका.

भरपुर पाणी प्यावे

दररोज किमान 2-3 लिटर पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ताजे रस आणि नारळ पाणी देखील पिऊ शकता. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि सौंदर्य वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com