
Bay Leaf Benefits: भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना परंपरागत महत्व प्राप्त झाले आहे. मसाल्यांशिवाय जेवणाला चव नसल्याचे म्हटले जाते. भारताबरोबर इतर देशांच्या व्यापारादेखील मसाल्यांमुळेच सुरुवात झाली. या मसाल्यातील पदार्थांचे आपल्या आरोग्यासाठीदेखील अनेक फायदे आहेत.
आज आपण अशाच एका मसाल्याचा आपल्या आरोग्यासाठीचे फायदे जाणून घेणार आहोत. तमालपत्र मसाल्यामधील एक महत्वाचा मसाला आहे. याचे आपल्या शरिरासाठी अनेक फायदे आहेत. अनेक आजारांना नष्ट करण्याचे काम हा तमालपत्र करत असतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त
तमालपत्र मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हे रक्तातील साखर नियंत्रित करू शकते आणि 2008 मध्ये प्रकाशित केलेला अभ्यासदेखील हेच सांगतो. या पानात पॉलिफेनॉल असते, जे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
कँन्सरपासून बचाव
कर्करोग एक धोकादायक आजार आहे. जो कोणत्याही रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतो. स्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. काही संशोधनात असे म्हटले आहे की या मसाल्यामुळे या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबू शकते.
श्वसनाच्या त्रासापासून मुक्तता
बॅक्टेरिया फुफ्फुसांना लक्ष्य करतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढू शकतात. श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना आवाज येणे, छातीत दुखणे यासारख्या समस्या असल्यास तमालपत्राचे पाणी पिल्याने त्यापासून तुमची सुटका होण्यास मदत मिळू शकते.
केसगळतीपासून सुटका
तमालपत्र वापरून कोंडा आणि केसगळतीपासून मुक्ती मिळवणारे बरेच लोक आहेत. असे मानले जाते की तमालपत्राच्या मिश्रणाने केस धुतल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि टाळूवरील संसर्ग दूर होतो. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.
तमालपत्र देखील अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. USDA च्या माहितीनुसार, या मसाल्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए इ. त्यात भरपूर प्रथिने देखील असतात , ज्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता भरुन निघते.
तमालपत्रात अँटीऑक्सिडंट्स, अँटी-कॅन्सर, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे पान जळजळ आणि उच्च रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होऊ शकते.
तमालपत्राचे सेवन कसे करावे?
वास्तविक, तमालपत्राचा सर्वाधिक वापर स्वयंपाकात केला जातो. पण तुम्ही चहा बनवून पिऊ शकता. यासाठी 1-2 तमालपत्र एका ग्लास पाण्यात काही वेळ उकळा. अर्धे पाणी उरले की ते गाळून कोमट प्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.