Baby Care Tips: लहान बाळांना टॅल्कम पावडर लावताय? मग बातमी वाचाच

लहान बाळांना पावडर लावणे त्याच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? तुम्हालाही असा प्रश्न पडला असेलच ना...चला तर मग आज जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर काय आहे.
Baby Care Tips
Baby Care TipsDainik Gomantak

Baby Care Tips: लहान बाळांना आंघोळ झाल्यावर आई शरीरातील ओलावा कमी करण्यासाठी करड्याने पुसते. तसेच पावडर देखाल लावते. असे केल्याने त्यांना असे वाटते की घामाचा आणि दुधाचा वास दूर होते.

पण तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी असे करणे खरोखरच योग्य आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. लहान बाळांच्या मुलायम त्वचेसाठी टॅल्कम पावडर खूप हानिकारक असू शकते. कसे ते जाणून घेऊया.

  • बेबी पावडर कशी बनवतात?

बेबी पावडर बनवण्यासाठी टॅल्कमचा वापर केला जातो.

टॅल्कम हे सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनपासून बनवलेल्या खनिजांपासून तयार केले जाते.

त्याचे लहान कण श्वासोच्छवासाद्वारे बाळाच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

ज्यामुळे बाळाला श्वास घेण्यास आणि फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो.

  • बेबी पावडरचे दुष्परिणाम

टॅल्कम पावडरचे कण खूप लहान असतात. यामुळे ते सहज शरीरात प्रवेश करू शकतात.शिवाय बाळाच्या त्वचेची छिद्रे रोखू शकतात. पावडरचा अतिवापर एलर्जीची समस्या निर्माण करू शकते.पावडरचा वापर ६ महिन्यापेक्षा लहान बाळांसाठी करू नका.

Baby Care Tips
Parenting Tips: 'या' वयातील मुले पालकांपासून लपवतात गोष्टी
  • बेबी पावडर लावताना कोणती काळजी घ्यावी

बेबी पावडर बाळाच्या त्वचेवर लावण्याऐवजी हातात घ्यावी आणि मगच लावावी.असे करतांना जास्त पावडर लावू नका.

बाळाला पावडर लावताना त्याचा डबा बाळापासून दूर ठेवावा. तसेच एकाच वेळी पावडर घेऊन न लावता थोडी घेऊन लावावी.

बाळाला पावडर लावताना ते कधीही पंखा किंवा कूलरच्या हवेखाली झोपवून लावू नका. असे केल्याने पावडर श्वासाद्वारे बाळाच्या तोंडात किंवा डोळ्यात जावू शकते.

बाळाच्या चेहऱ्यावर बेबी पावडर लावू नका. असे केल्याने त्वचेची एलर्जी आणि रॅशेस येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com